झूम... : बाइक की स्कूटर?

Bike-and-Scooter
Bike-and-Scooter

एकेकाळी फक्त स्कूटरचं साम्राज्य असताना लोक हळूहळू बाइक्सकडे वळले. नंतर पुन्हा नवनवीन प्रकारच्या स्कूटर्स बाजारात आल्यानंतर आता पुन्हा दोन्ही पर्याय समर्थपणे उभे राहिले आहेत. तरुणाई पूर्वी स्कूटर्सकडे वळायची नाही. पण, आता सगळ्याच स्कूटर्स अतिशय स्टायलिश झाल्या आहेत आणि मायलेजही वाढू लागलं आहे. त्याच वेळी बाइक्समध्येही खूप सुधारणा होत आहेत. त्यामुळे या दोन्हीपैकी कोणत्या पर्यायाची निवड करायची, असा प्रश्न पडतो. तुम्हालाही हा प्रश्न पडत असेल, तर निवडीसाठी या मुद्द्यांचा विचार करावा...

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

  • बाइक्सचं मायलेज सर्वसाधारणपणे स्कूटर्सपेक्षा जास्त असतं. काही बाइक्सचं मायलेज तर खूपच असतं. त्यामुळे फक्त मायलेज हा मुद्दा असेल, तर बाइक्स उत्तम. 
  • पाठीचे त्रास असतील, पाय खूप फ्लेक्झिबल नसतील तर अशा वेळी स्कूटरचा विचार करा. बाइक्स चालवताना पाठीचं विशिष्ट पोस्चर लागतं. त्यामुळे नंतर पाठीवर ताण येऊ शकतो. बाइकवर स्वार होताना पाय वरच्यावर टाकावा लागत असल्यानं किरकोळ अपघात वगैरे झाला तर ती सावरायला पण कठीण जातं. या गोष्टीचाही विचार करा. स्कूटरमध्ये पुढच्या भाग मोकळा असल्यानं ती पटकन् सावरता येते. ती चालवताना पाठीवरही तितका ताण येत नाही. 
  • बाइक्स तुलनेनं दणकट असतात. त्यामुळे मेंटनन्सच्या दृष्टीनं त्या खूप सोप्या असतात. टायर्स खूप चांगले असतात. त्यामुळे गाडी पंक्चर होणं, नादुरुस्त होणं असे प्रकार स्कूटरच्या तुलनेत बाइकमध्ये कमी असतात. 
  • स्टाइलचा विचार केला, तर हल्ली दोन्हीही भारी असतात. स्कूटर्स हे तरुणींचं वाहन असा शिक्काही आता पुसला आहे. मात्र, अगदीच ‘माचो लूक’च्या शोधात असलात, तर बाइकला अर्थातच पर्याय नाही. 
  • सामानाची ने-आण करणं हे प्राधान्य असेल, तर स्कूटरला अजिबात पर्याय नाही. पायांसमोरच्या भागात, डिक्कीमध्ये खूप सामान ठेवता येऊ शकतं. हल्ली तर अगदी फोन चार्ज करण्याची सोयसुद्धा अनेक स्कूटर्सच्या डिक्कींमध्ये असते. त्यामुळे या गोष्टीचा विचार नक्की करा. 
  • वेगावर कंट्रोल करणं बाइक्समध्ये मॅन्युअल गिअर्समुळे तुलनेनं सोपं जातं. त्यामुळे ती गोष्ट विचारात घ्या. 
  • खूप लांबचा प्रवास सतत करावा लागत असेल, तर बाइक्स बेस्ट. बाइक्सची एकदा सवय झाली, की मग त्यांच्या आपण प्रेमात पडतो.
  • पावसाळ्यात स्कूटरमध्ये कपडे खराब होण्याची शक्यता तुलनेनं कमी असते. बाइक्सला मडगार्ड लावता येतात, पण ते तिचा लूक बिघडवतात.

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com