झूम... : ‘लाइटवेट’ सवारी...

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 25 November 2020

दुचाकी, ही अर्थातच प्रवासासाठी आणि सामानाच्या वाहतुकीसाठी वापरली जाते. मात्र, प्रत्येक प्रकारच्या दुचाकीचे फायदे आणि तोटे असतात. स्कूटर्समधून सामान नेता येतं; पण त्या बोजड असतात. बाइक्समुळे शान वाढते; पण सामान न्यायची पंचाईत होते. स्कूटरेट्स वगैरे उपयोगी पडतात; पण त्यांच्यात शक्ती कमी असल्यानं चढावर वगैरे अडचणी येतात. या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन हल्ली स्कूटर प्रकारच्या गाड्यांमध्ये बरेच बदल केले जात आहेत, असं दिसतं.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

बाइक्सपेक्षा त्यांच्यात ‘युज’च्या दृष्टीनं प्रयोगांच्या शक्यता आणि संधीही जास्त असतात. हल्ली स्कूटरचं वजन या मुद्द्यावरही खूप काथ्याकूट केला जातो आणि त्यामुळे कंपन्यांनीही त्यावर बरंच संशोधन केल्याचं दिसतं. त्यामुळं काही गाड्यांचं वजन कमी होत आहे आणि इतर काही गोष्टी समाविष्ट होत आहेत, असं दिसतं. अशाच काही लाइटवेट गाड्यांची माहिती आपण बघूया.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

टीव्हीएस स्कूटी पेप प्लस
इंजिनक्षमता - ८७.८ सीसी
पेट्रोल टाकी -  ४.२ लिटर
वजन - ९३ किलो 
किंमत - ५२,५५७ रुपये

सुझुकी ॲक्सेस १२५ बीएस ६
इंजिनक्षमता - १२४ सीसी     
पेट्रोल टाकी - ५ लिटर 
वजन - १०४ किलो     
किंमत - ७२,२८० रुपये

होंडा ॲक्टिव्हा आय
इंजिनक्षमता - १०९.१९ सीसी 
पेट्रोल टाकी - ५.३ लिटर
वजन - १०३ किलो 
किंमत - ५३,१९४ रुपये

यामाहा रे झेडआर १२५
इंजिनक्षमता - १२५ सीसी
पेट्रोल टाकी - ५.२ लिटर
वजन - ९९-१०५ किलो
किंमत - ५४,७३२-७६,७०० रुपये

Edited By - Prashant Patil

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: article write on lightweight vehicle