Mumbai: सामाजिक संवेदनाला आत्मियतेची जोड

राज्यात मुलींसाठी ‘लेकीला नेऊ समृद्धीकडे’ उपक्रम, प्रणिता देवरे- चिखलीकर यांचा पुढाकार.
 प्रणिता देवरे- चिखलीकर
प्रणिता देवरे- चिखलीकर

मुंबई : मूळ नांदेडच्या आणि सध्या मुंबईत स्थायिक असणाऱ्या प्रणिता देवरे- चिखलीकर यांनी शाळा आणि महाविद्यालयांत जाऊ न शकणाऱ्या मुलींसाठी ‘लेकीला नेऊ समृद्धीकडे’ असा अनोखा उपक्रम सुरू केला आहे. या उपक्रमाची सध्या राज्यभर चर्चा सुरू आहे. ग्रामीण भागात आजही मुलींच्या शिक्षणाप्रती उदासीनता दिसून येते.

ज्या- ज्या भागात या स्वरूपाची उदासीनता आहे. त्या- त्या भागात सर्व्हे करून मुलींच्या शिक्षणासाठी पावले उचलण्याचे काम नांदेड जिल्ह्यातून सुरू झाले होते. आता राज्यभरात ‘लेकीला नेऊ समृद्धीकडे’ या उपक्रमाने गती घेतली आहे. या उपक्रमामुळे शहर आणि गावपातळीवर असणाऱ्या शेकडो मुली शिक्षणाच्या प्रवाहात येत आहेत.

नांदेडमध्ये राजकारणामुळे स्थिरावलेल्या प्रणिता देवरे- चिखलीकर या उच्च शिक्षित महिला आहेत. प्रणिता सामाजिक कार्यात प्रचंड रुची ठेवणाऱ्या महिला आहेत. प्रणिता भारतीय जनता पार्टीच्या महिला मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष आहेत. लहानपणापासून प्रणिता यांची ग्रामीण भागाशी चांगली नाळ जोडली आहे.

ग्रामीण परिस्थिती प्रणिता यांनी अगदी जवळून अनुभवली आहे. मुलींच्या शिक्षणाला घेऊन अतिशय संवेदनशील असणाऱ्या प्रणिता यांनी एकदा दोन मुलींना शिक्षणासाठी मदत केली. त्या मुली शिकल्या. प्रणिता यांच्या लक्षात आले, ज्या दोन मुलींना त्यांनी मदत केली.

त्या दोन मुली शिक्षणाच्या प्रवाहामधून बाहेर फेकल्या जाणार होत्या. ज्या प्रणिता यांच्यामुळे शिक्षणाच्या प्रवाहात आल्या. त्यांनी सुरुवातीला लोहा कंधार भागातून अशा गरजू मुलींना मी मदत करणार आहे, असे आवाहन जनतेला केले.

तेव्हा पहिल्या टप्प्यात ८० मुलींच्या पालकांनी मदत मागितली. त्या सर्व ८० मुली शिक्षणाच्या प्रवाहात आल्या. त्या मुली शाळेच्या माध्यमातून सोनेरी भविष्याचे स्वप्न पाहू लागल्या.

प्रणिता यांनी महाविद्यालयीन जीवनापासून अनेक सामाजिक कामांतून आपल्या चांगुलपणाचा, सामजिक कार्याचा ठसा उमटविला होता. त्या सर्व कामापेक्षा मुलींच्या शिक्षणासाठी त्यांनी केलेली मदत प्रणिता यांना फार महत्त्वाची वाटली. हे काम वाढले पाहिजे.

 प्रणिता देवरे- चिखलीकर
Mumbai : सर्पदंशामुळे कल्याणमधील मुलाचा मृत्यु

यासाठी प्रणिता यांनी पूर्णवेळ हे काम हाती घेतले. त्यासाठी त्यांनी अगोदर नांदेड जिल्ह्यात सर्व्हे केला. गरजू मुलींची खात्रीशीर यादी तयार करत मुलींना मदत द्यायला सुरुवात केली. शाळेपासून वंचित असणाऱ्या मुलींचा आकडा नांदेड जिल्ह्यात तीनशेपेक्षा जास्त झाला.

चांगल्या शाळेत लागणारे शुल्क, प्रवेशासाठी राजकीय पत्रव्यवहार, शालेय साहित्य, ड्रेस, सायकल, कुठे रूमचे भाडे, कुठे मेससाठी पैसे, कुठे परदेशात पाठवण्यासाठी मदत अशा स्वरूपाची मदत त्या करू लागल्या.

प्रणिता यांनी मुली निवडताना टीमच्या माध्यमातून केलेला सर्व्हे खूप महत्त्वाचा ठरला. अगोदर नांदेड जिल्हा, मराठवाडा, मग विदर्भ, असा राज्यातील एक एक भाग त्यांनी काबीज करण्यास सुरुवात केली.

राज्यात अनेक युवतींशी बोलून त्यांनी सामाजिक कार्यात हिरीरीने सहभाग नोंदवावा यासाठी प्रणिता देवरे- चिखलीकर यांचा पुढाकार असतो. याच कार्यक्रमादरम्यान त्या ‘लेकीला नेऊ समृद्धीकडे’ या उपक्रमाबाबत ही बोलतात.
राज्यात अनेक युवतींशी बोलून त्यांनी सामाजिक कार्यात हिरीरीने सहभाग नोंदवावा यासाठी प्रणिता देवरे- चिखलीकर यांचा पुढाकार असतो. याच कार्यक्रमादरम्यान त्या ‘लेकीला नेऊ समृद्धीकडे’ या उपक्रमाबाबत ही बोलतात.
 प्रणिता देवरे- चिखलीकर
Mumbai Black Magic : अमावस्येच्या रात्री कोंबड्याची सुटका, सुशिक्षितांच्या डोंबिवलीत ब्लॅक मॅजिकचा प्रकार

“आता सर्व राज्यात मदत केलेल्या मुलींचा आकडा अडीच हजारांच्या वर गेला आहे. हा आकडा किती मोठा होणार आहे, मला किती खर्च लागणार आहे हे मी नाही पाहणार, पण माझ्या टीमचा सर्व्हे राज्याच्या कानाकोपऱ्यात होईल.

जिथे जिथे आशा गरजू मुली आहेत, त्यांना मी मदत करणार आहे,” असे प्रणिता देवरे-चिखलीकर सांगत होत्या. ‘गरिबीतून जन्माला आलेली ती प्रत्येक मुलगी शिक्षणापासून कधीही वंचित राहू नये, यासाठी एक शैक्षणिक हेतूने झपाटलेली ही चळवळ राज्यभर रुजवण्याचा मानस प्रणिता यांनी व्यक्त केला आहे.

प्रणिता देवरे- चिखलीकर यांनी या चळवळीची एक पंचसूत्री बनवली आहे. बालवाडीपासून ते उच्च शिक्षण घेणाऱ्या मुलींना मदत, त्यांना ज्या कारणास्तव मदत केली जात आहे ते काम साध्य होते की नाही, हे याचे निरीक्षण करून त्या कामाला योग्य वळण देणे.

पालकांचे समुपदेशन करणे. उच्च शिक्षण, तांत्रिक शिक्षण पूर्ण झालेल्या मुलींना नोकरीसाठी पूर्णतः मदत करणे. मुलींना उद्योगासाठी चालना देत मदत करणे.

या स्वरूपात त्यांनी काम उभे केले आहे. अनेक गरजू, आर्थिकदृष्ट्या सक्षम नसणाऱ्या, शेतकरी, बहुजन यांच्या मुलींनी, त्यांच्या पालकांनी संपर्क या कामी नक्की संपर्क साधावा, आणि ‘लेकीला नेऊ समृद्धीकडे’ या चळवळीचा भाग बनवा, असे आवाहन प्रणिता देवरे- चिखलीकर यांच्या वतीने करण्यात आले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com