सुरक्षिततेचं भान तुम्ही बाळगता का? 

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 7 January 2021

बाइक असो किंवा इतर कोणतं वाहन; ते चालवण्याचा आनंद घेताना तुम्ही सुरक्षिततेचे नियम पाळता का? अपघात होऊ नयेत आणि अर्थातच गाडीचंही नुकसान होऊ नये यासाठी या काही गोष्टी लक्षात ठेवा. 

- टू-व्हीलर चालवताना हेल्मेट अतिशय आवश्यक. मेंदू हा आपल्या शरीरातला सर्वांत महत्त्वाचा आणि संपूर्ण शरीराचं नियंत्रण करणारा अवयव. त्याचं संरक्षण करण्यासाठी हेल्मेट नक्की घाला. थोडं त्रासदायक नक्की वाटेल; पण त्याला इलाज नाही. हेल्मेट घेताना सुरक्षितताविषयक सगळे नियम त्यात काटेकोरपणे पाळले असतील याची खातरजमा करून घ्या. स्वस्त मिळतात म्हणून दर्जा कमी असलेली हेल्मेट्स घेऊ नका. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

- इतर वाहनांपासून सुरक्षित अंतर ठेवा. आपण अनेक ठिकाणी हे वाचलेलं असतं; पण आपण त्याचं भान बाळगत नाही. विशेषतः उतारावर दुसऱ्या वाहनाच्या मागं असतो तेव्हा तर अंतर नक्की ठेवलं पाहिजे. कोणत्या क्षणी काय होईल सांगता येत नसतं. दुसऱ्या वाहनाच्या मागे असताना सुरक्षित अंतर ठेवलं पाहिजे, तसंच वाहनाच्या पुढं असतानाही सुरक्षित अंतर ठेवलं पाहिजे. चालवताना किंवा थांबली असताना वाहने अगदी चिकटून असल्यास अपघातांची शक्यता जास्त असते. 

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

- मोठ्या रस्त्यांवर येणाऱ्या छोट्या गल्ल्या, धोकादायक वळणं अशा ठिकाणी वाहन चालवण्याची गती कमी करा. कोणत्या दिशेनं काय येऊ शकतं सांगता येत नाही. त्यामुळं अशा विशिष्ट टप्प्यांवर सावधपणे वाहन चालवणं आवश्यक. अनेकदा अशा ठिकाणी वाहनचालक समोर बघत असतो, त्यामुळं डावीकडून किंवा उजवीकडून काय येत आहे त्याकडं त्याला लक्ष देता येत नाही. विशेषतः वाहनाची गती जास्त असल्यास अगदीच स्वाभाविक. त्यामुळं अशा ठिकाणी गती कमी करणं, हॉर्न देणं अशा गोष्टी अतिशय महत्त्वाच्या. वाहनचालक हा अष्टावधानी असणं गरजेचं असतं असं म्हटलं जातं, ते अतिशय योग्य. 

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

- स्पीडब्रेकर्स, खड्डे, चिखल, तेलाचा थर पसरलेला रस्ता, मोकाट जनावरे असलेली ठिकाणं अशा ठिकाणी वाहन चालवताना खूप सावध राहा. वेग कमी करायचाच; पण अशा ठिकाणी संतुलनही साधणं ही गोष्ट कठीण असतं. त्यामुळं त्याबाबतही काळजी घ्या. अनेक अपघात हे अशा ठिकाणीच होतात, हे लक्षात घ्या. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Do you follow safety rules while riding a bike or vehicle

Tags
टॉपिकस
Topic Tags: