कोव्हिड काळात मोबाईलचा फुल्ल ‘डोस’ 

ऋषिराज तायडे
Thursday, 14 January 2021

देशातील प्रमुख आठ शहरांमध्ये या बाबत सर्वेक्षण करण्यात आले. लॉकडाउनच्या काळात ‘वर्क फ्रॉम होम’ आणि कॉलिंग व्यतिरिक्त ओटीटी प्लॅटफॉर्म, समाज माध्यम आणि गेमिंगसाठी मोबाईल सर्वाधिक वापर झाला.

लॉकडाउनच्या सात ते आठ महिन्यांमध्ये तुमच्या-आमच्यापैकी अनेक जण घरीच होते. या काळात ‘वर्क फ्रॉम होम’ आणि ‘ऑनलाइन एज्युकेशन’मुळे मोबाईलचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला. कोरोनाच्या काळात भारतात मोबाईलच्या वापरात सुमारे २५ टक्के वाढ झाली असून. एका दिवसातील मोबाईलचा वापर सुमारे सात तासांवर गेल्याचे एका मोबाईल कंपनीने केलेल्या अहवालातून स्पष्ट झाला आहे. देशातील प्रमुख आठ शहरांमध्ये या बाबत सर्वेक्षण करण्यात आले. लॉकडाउनच्या काळात ‘वर्क फ्रॉम होम’ आणि कॉलिंग व्यतिरिक्त ओटीटी प्लॅटफॉर्म, समाज माध्यम आणि गेमिंगसाठी मोबाईल सर्वाधिक वापर झाला. दरम्यान, मोबाईल वापरामुळे फायद्यांबरोबर नतेसंबंधांवरचे दुष्परिणामही समोर आले. 

मोबाईलचा वाढता वापर (दैनंदिन) 
२०१९मध्ये मोबाईलचा वापर - ४.९४ तास 
कोव्हिडपूर्व काळ (मार्च-२०२०पर्यंत) - ५.४८ तास 
कोव्हिडोत्तर काळ (एप्रिलपासून पुढे) - ६.८४ तास 

मोबाईलचा सर्वाधिक वापर 
वर्क फ्रॉम होम - ७५ टक्के 
कॉलिंग - ६३ टक्के 
ओटीटी - ५९ टक्के 
समाज माध्यम - ५५ टक्के 
गेमिंग - ४५ टक्के 

मोबाईलचे व्यसन 
सहकाऱ्यांशी बोलत असतानाही मोबाईल वापरण्याचे प्रमाण - ८८ टक्के 
तासाभराच्या चर्चेवेळी किमान ४ -५ वेळा मोबाईल तपासणे - ४६ टक्के 
मोबाईलच्या अतिवापरामुळे मानसिकतेवर परिणाम होत असल्याची जाणीव - ७० टक्के 
मोबाईल सोबत नसल्यास चिडचिडेपणा, हरवलेपणाची जाणीव - ७४ टक्के 
शयनकक्षातही मोबाईलचा वापर - ८४ टक्के 
जेवतानाही मोबाईलचा वापर - ७१टक्के 

आयुष्याला वेढले मोबाईलने 
- झोपेतून उठल्यावर १५ मिनिटांतच मोबाईल तपासणे - ८४ टक्के 
- डोळे उघडताच - १६ टक्के 
- पहिल्या पाच मिनिटात - १९ टक्के 
- पाच ते दहा मिनिटात - २८ टक्के 
- दहा ते पंधरा मिनिटात - २१ टक्के 
- पंधरा ते तीस मिनिटात - ९ टक्के 
- अर्ध्यातासाहून अधिकवेळ - ७ टक्के 

दुष्परिणामात वाढ 
मोबाईलच्या अतिवापरामुळे प्रियजनांना पुरेसा वेळ देता येत नाही - ८९ टक्के 
मोबाईलशिवाय आयुष्यात इतरही महत्त्वाच्या गोष्टी आहेत - ७४ टक्के 
मोबाईलमुळे नात्यांवर मोठा दुष्परिणाम झाला - ७० टक्के 

अशीही इच्छा 
- काही वेळासाठी मोबाईल बंद करता आल्यास बरे वाटेल - ७३ टक्के 
- काहीवेळ मोबाईल बंद करून प्रियजनांसोबत वेळ घालवता येईल - ७४ टक्के 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: During the Corona period mobile usage in India increased by about 25 percent

Tags
टॉपिकस
Topic Tags: