गुगल मॅपचा प्रवास १५ वर्षांचा!

ऋषिराज तायडे
बुधवार, 19 फेब्रुवारी 2020

आपला वाटाड्या, ‘मार्ग’दर्शक अशी ओळख असलेला गुगल मॅप आता १५ वर्षांचा झाला आहे.

तुम्हाला एखाद्या इच्छित स्थळी जायचे असल्यास पूर्वी त्या ठिकाणचा पत्ता विचारत होतो. आता मात्र एखादा पत्ता शोधायचा असल्यास आपण मदत घेतो ती गुगल मॅपची. आपला वाटाड्या, ‘मार्ग’दर्शक अशी ओळख असलेला गुगल मॅप आता १५ वर्षांचा झाला आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

दरम्यान, अनेक नवनवीन सुविधा गुगल मॅपने दिल्या. स्ट्रीट व्ह्यू, ट्राफिक अपडेट, गुगल अर्थ यासोबतच आधुनिक तंत्रज्ञान असलेल्या ऑग्मेन्टेड रिॲलिटीचीही सुविधा उपलब्ध केली. गुगलचा २००५मध्ये सुरू झालेला प्रवास आता काळानुरूप बदलत आणि नव्या फीचर्ससह प्रगल्भ होत चालला आहे. गुगल मॅपच्या नव्या लोगोची १५ वर्षे पूर्ण झाल्याने नव्याने अनावरण करण्यात आले आहे. सात वेगवेगळ्या रंगांचा वापर करून तयार केलेला नवा लोगो आकर्षक दिसत आहे. नुकत्याच सादर झालेल्या नव्या अपडेटमध्ये नव्या लोगोसह नवे फीचर्स दिले असून, त्यात नेव्हिगेशनवर भर दिला आहे. शिवाय, महत्त्वाचे पर्याय खालच्या टॅबवर उपलब्ध असतील. जाणून घेऊया नव्या सुविधांबाबत...

एक्‍स्प्लोर - आपल्यानजीक असलेली प्रेक्षणीय स्थळे, हॉटेल्स, कॅफे आदींबाबत माहिती घेऊन त्याचे रिव्ह्यू जाणून घेऊ शकता.
कम्यूट  - तुम्हाला इच्छित स्थळी जाण्याचा मार्ग, त्यासाठी लागणारा वेळ, याबाबत माहिती मिळेल.
सेव्हड्   -  तुम्ही भेट दिलेल्या किंवा भविष्यात उपयोगी पडेल अशा स्थळांचा पत्ता साठवून ठेवू शकता.
कॉन्ट्रिब्यूट -  गुगल मॅपकडे नसलेली माहिती, नवे ठिकाण, नव्या स्थळांबाबतची माहिती तुम्ही अद्ययावत करू शकता.
अपडेट्‌स  - वरील प्रकारे कोणी अन्य नवी माहिती समाविष्ट केल्यास त्याबाबतची माहिती तुम्हाला इथे मिळेल.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Google maps is now fifteen year old