भारती विद्यापीठात वार्षिक कला प्रदर्शनाचे उद्घाटन.

कला आणि कल्पना यांच्या मध्ये भावनाही महत्त्वाच्या : चारुदास पंडित
भारती विद्यापीठ वार्षिक कला प्रदर्शनाचे उद्घाटन प्रसिद्ध व्यंगचित्रकार चारुदास पंडित यांच्या हस्ते संपन्न झाले
भारती विद्यापीठ वार्षिक कला प्रदर्शनाचे उद्घाटन प्रसिद्ध व्यंगचित्रकार चारुदास पंडित यांच्या हस्ते संपन्न झाले
Updated on

पुणे दि. ०५ : कला आणि कल्पना यांच्यामध्ये भावनाही महत्त्वाच्या आहेत. सध्याच्या व्यवसायिक जगामध्ये कलेतून आलेली कल्पनाही विकता येते. असे प्रतिपादन प्रसिद्ध व्यंगचित्रकार चारूदास पंडित यांनी केले. कला महाविद्यालय, कॉलेज ऑफ फाईन आर्ट, भारती कला महाविद्यालय आणि स्कूल ऑफ व्हिज्युअल आर्टस् यांच्यातर्फे भारती विद्यापीठाच्या धनकवडी येथील शैक्षणिक संकुलात आयोजित वार्षिक कला प्रदर्शनाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी प्रसिद्ध चित्रकार प्रा. मिलिंद फडके, बाबामामा शिंदे, प्राचार्या डॉ. अनुपमा पाटील, प्राध्यापक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पंडित म्हणाले, कल्पनेतून साकारलेल्या चिंटूच्या व्यंगचित्राचे मला वृत्तपत्राच्या माध्यमातून त्याचे व्यवसायिकरण करता आले. तसे विद्यार्थ्यांनीही कल्पनेतून आलेल्या कलेचे व्यावसायिकरण करणे काळाची गरज आहे.

फडके म्हणाले, भावनांशिवाय शाश्वत निर्मिती होत नाही. कलेमध्ये येऊ घातलेल्या तंत्रज्ञानाच्या जोडीला कलाकारास भावनांचे रंग भरता यायला हवेत त्यासाठी त्याने नवनिर्मिती कडे लक्ष द्यावे.

या प्रदर्शनामध्ये चित्रकला, शिल्पकला, उपयोजित कला, ए.टी.डी. आणि जी.डी.आर्टस् या सर्व विभागातून ५००० पेक्षा जास्ती कलाकृती प्रदर्शित करण्यात आल्या आहेत. एवढ्या मोठ्या प्रमाणात कलाकृती प्रदर्शित करणारे हे एकमेव महाविद्यालय आहे. कॉलेज ऑफ फाईन आर्टस् महाविद्यालय यावर्षी आपले रौप्यमहोत्सवी वर्ष साजरे करीत असून हे वार्षिक कला प्रदर्शन ४ ते ९ फेब्रुवारी पर्यंत सर्वांना नि:शुल्क खुले असणार आहे.

डॉ. गिरीष चरवड,प्रा. मंगेश तांबे, प्रा. सुनील देशपांडे, यांनी प्रदर्शनाची जबाबदारी यशस्वीरित्या पार पाडली. आभार उपप्राचार्य प्रा. रुपेश हिरूगुडे यांनी मानले तर सूत्रसंचालन डॉ. संजय भालेराव यांनी केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com