प्रीमियम सेगमेंटमधील नवे स्मार्टफोन्स 

प्रीमियम सेगमेंटमधील नवे स्मार्टफोन्स 

वनप्लसची-८वी श्रेणी 
वनप्लसने अल्ट्रा-प्रीमियम वन प्लस ८ प्रो आणि कॉम्पॅक्‍ट फ्लॅगशिप वनप्लस-८ यांचा समावेश असलेली वनप्लस-८ ही नवीकोरी श्रेणी सादर केली. ‘वनप्लस-८’ ही आजवरची वनप्लसची ताकदवान आणि फ्लॅगशिप स्मार्टफोन श्रेणी असल्याचा दावा वनप्लसचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी पीट लाऊ यांनी केला आहे. 

वनप्लस-८ प्रो 

डिस्प्ले 
१२० हर्टझ वेगवान रिफ्रेश रेटसह ६.७८ इंची दर्जेदार फ्लुइड डिस्प्ले दिला आहे. रिफ्रेशिंग रेट प्रति सेकंदाला १२० असल्याने तुम्हाला ॲनिमेशन आणि व्हिडिओ प्लेबॅक अगदी प्रवाहीपणे अनुभवता येतो. प्रगत मोशन एस्टिमेशन, मोशन कॉम्पेन्सेशनमुळे व्हिडिओच्या वेगवान फ्रेम्स पाहता येतात, त्यातून हालचालींची अस्पष्टता कमी होऊन उत्तम स्पष्टता मिळते. 

दर्जेदार क्षमता 
स्नॅपड्रॅगन ८६५ प्रोसेसर आणि क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन एक्‍स ५५जी मोडेम-आरएफ सिस्टममुळे क्षमता दर्जेदार बनली आहे. त्यामुळे उत्तम कनेक्‍टिव्हिटी, वेगवान परफॉर्मन्स, दर्जेदार फोटोग्राफी, जबरदस्त गेमिंग अनुभव मिळतो. १२ जीबीपर्यंत अत्याधुनिक LPDDR५ रॅम असल्याने वेगवान परफॉर्मन्स मिळतो. 

फुल कॅमेरा किट 
कस्टम मेड सोनी सेन्सर, १२० अंशाच्या ‘फील्ड ऑफ व्ह्यू’सह ४८ एमपी अल्ट्रा वाइड लेन्स, ३x हायब्रिड आणि ३०x डिजिटल झूमसह टेलिफोटो लेन्स, खास कलर फिल्टर कॅमेरा यांच्यासह ४८ एमपी मुख्य कॅमेऱ्यामुळे फोटोग्राफर किंवा व्हिडिओग्राफरच्या गरजांची पूर्तता करण्यास सक्षम आहे. 

वायरलेस चार्जिंग अनुभव 
‘वॉर्प चार्ज ३०’ हे नवे वायरलेस चार्जिंग सोल्युशन दिले आहे. त्यामुळे ४३१० एमएएच क्षमतेची बॅटरी अवघ्या ३० मिनिटांत ५० टक्के चार्ज करता येते. 

--------------- 
वनप्लस-८ 

डिस्प्ले 
- ६.५५ इंच फ्लुइड डिस्प्लेमुळे सिनेमॅटिक दृश्‍यांचा अप्रतिम अनुभव मिळतो. ९० हर्टझ रिफ्रेशिंग रेटमुळे विनाअडथळा सिनेमा किंवा व्हिडिओ पाहता येतात. २०ः९ अस्पेक्‍ट रेशोमुळे स्मार्टफोनवर सिनेमा बघताना, ऑनलाइन गेम्स खेळताना वेगळाच अनुभव मिळतो. 

- कॅमेरा 
प्रत्येक क्षण सुस्पष्ट टिपण्यासाठी ट्रिपल कॅमेरा सेटअप दिला आहे. सोनीच्या ४८ मेगापिक्‍सल आयएमएक्‍स सेन्सरमुळे स्पेक्‍ट्रा ४८० इमेज सिग्नल प्रोसेस होतात. कॅमेरा सेटअप पूर्ण करणारी ११६ अंशांचे भव्य दृश्‍य टिपणारी १६ मेगापिक्‍सल अल्ट्रावाइड अँगल लेन्स भव्य निसर्गदृश्‍ये पॅनोरामिक व्ह्यूसह टिपली जातात. 

- कामगिरी 
स्नॅपड्रॅगन ८६५चे प्रोसेसर आणि स्नॅपड्रॅगन एक्‍स ५५जी मोडेम-आरएफ सिस्टम असल्याने उत्तम कामगिरीची नोंद केली जाते. १२ जीबी रॅममुळे वेगवान कामगिरीचा अनुभव मिळतो. 

- वायरलेस चार्जिंग 
अपग्रेडेड ४३०० एमएएच क्षमतेची बॅटरी दिली असून वॉर्प ‘चार्ज ३०टी’ या वायरलेस चार्जिंगमुळे अवघ्या २२ मिनिटांत ५० टक्के बॅटरी चार्ज करते. 

- डिझाइन 
केवळ १८० ग्रॅम वजन आणि ८ मिलिमीटर जाडी असलेला हा बाजारपेठेतील सर्वात कमी जाडीचा आणि कमी वजनाचा स्मार्टफोन असल्याचा दावा कंपनीने केला आहे. 

--------------- 

आयफोन एसई-२०२० 

ॲपलने सर्वांत स्वस्त आणि परवडणाऱ्या आयफोन एसई-२०२० हा नवा स्मार्टफोन सादर केला. ६४ जीबीच्या बेसिक मॉडेलसाठी अमेरिकेत या स्मार्टफोनची किंमत सुमारे ४२,५०० रुपये जाहीर केली आहे. आयफोन एसई-२०२० ची डिझाईन बऱ्याच अंशी आयफोन-८ सारखी आहे. आयफोनच्या या मॉडेलमध्ये ६४, १२८ आणि २५६ जीबी असे वेगवेगळे मॉडेल्स देण्यात आले आहे. १२८ आणि २५६ जीबी मॉडेल्सच्या किमती अद्याप जाहीर केलेल्या नाहीत. 

नव्या आयफोन एसई २०२०मध्ये १२ मेगापिक्‍सल मुख्य कॅमेरा आणि फ्लॅशही दिला आहे. एचडीआर टेक्‍नॉलॉजीच्या मदतीने दर्जेदार फोटो काढण्याचा अनुभव मिळतो. मुख्य कॅमेरा ४-के व्हिडिओ चित्रित करण्यासाठी सक्षम आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी ७ मेगापिक्‍सलचा फ्रंट कॅमेरा दिला असून तो पोर्ट्रेट मोडसारख्या पर्यायांसोबत उपलब्ध आहे. आयफोनने या स्मार्टफोनमध्येही आयफोन-८ सारखीच बॅटरी दिल्याचे सांगितले जाते. १८ वॉटच्या फास्ट चार्जिंगसह या स्मार्टफोनमध्ये ड्युएल सीम सपोर्ट दिला आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com