

राष्ट्रीय सेवा योजना युनिट A-65 आणि सामाजिक कल्याण व विकास समिती, विश्वकर्मा अभियांत्रिकी महाविद्यालय, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने कोंढणपूर गावात ११ डिसेंबर २०२४ ते १७ डिसेंबर २०२४ या कालावधीत सात दिवसीय राष्ट्रीय सेवा योजना शिबिर यशस्वीरीत्या संपन्न झाले. या शिबिरामध्ये विद्यार्थ्यांनी विविध क्षेत्रांमध्ये उपक्रम राबवून समाजसेवेचा आदर्श घालून दिला. शिक्षण क्षेत्रात गावातील प्राथमिक आणि माध्यमिक शाळांतील विद्यार्थ्यांसाठी सायबर सुरक्षा, सर्पदंश जनजागृती, डिजिटल साक्षरता, योगा, चित्रकला, आणि क्रीडा कार्यशाळा आयोजित केल्या गेल्या. या कार्यशाळांमुळे विद्यार्थ्यांमध्ये तांत्रिक ज्ञान, सर्जनशीलता आणि शारीरिक तंदुरुस्तीबाबत जागरूकता निर्माण झाली. प्रचार आणि जनजागृती उपक्रमांतर्गत महिलांसाठी गृहिणी कार्यक्रम, मानसिक आरोग्य व मानसिक सामर्थ्य जागरूकता सत्र, कीर्तन, शिवव्याख्यान तसेच पथनाट्यांचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमांमुळे गावकऱ्यांमध्ये सामाजिक आणि मानसिक विकासाला चालना मिळाली. शिबिरादरम्यान विद्यार्थ्यांनी गावातील प्रत्येक मुली असलेल्या घरावर नावफलक लावून स्त्री जन्माचे महत्त्व अधोरेखित केले. याशिवाय, शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी कंपोस्ट खत निर्मिती, माती परीक्षण आणि सर्व उपक्रमांसाठी सर्वेक्षण केले. या सात दिवसांच्या कालावधीत राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. गजानन गंभिरे आणि विद्यार्थी उपक्रम समन्वयक डॉ. कौशल्या थोपटे यांनी विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शक म्हणून मोलाची भूमिका बजावली. त्यांच्या सततच्या पाठिंब्यामुळे विद्यार्थ्यांना विविध उपक्रम यशस्वीपणे राबवता आले. तसेच विद्यार्थी प्रतिनिधी ज्ञानेश्वरी घुगे सह सर्व स्वयंसेवकांनी उत्कृष्ट नेतृत्व पार पाडले.
श्रमदान या महत्त्वाच्या विभागांतर्गत गावातील सार्वजनिक ठिकाणांची स्वच्छता, वृक्षारोपण, नाला बांधणी यासारख्या उपक्रमांवर विशेष भर देण्यात आला. याशिवाय, शाळा व मंदिरांच्या भिंतींवर रंगकाम व सजावट करण्यात आली, ज्यामुळे सार्वजनिक ठिकाणांना नवे सौंदर्य लाभले. विद्यार्थ्यांनी चितळे बंधू उद्योग समूहाला भेट देऊन त्यांच्या उद्योग प्रक्रियेची माहिती घेतली, ज्यामुळे त्यांना व्यावसायिक ज्ञान आणि अनुभव मिळाला. या शिबिरादरम्यान गावकऱ्यांनीही उत्स्फूर्त सहभाग घेत विद्यार्थ्यांना भरभरून सहकार्य केले. शिबिराला महाविद्यालयातील प्राध्यापक आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांनी भेट देऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. शिबिरातील सर्व उपक्रम विद्यार्थ्यांनी स्वयंस्फूर्तीने नियोजनबद्ध पद्धतीने राबवले, ज्यामुळे त्यांच्या नेतृत्वगुणांना वाव मिळाला. विद्यार्थ्यांनी त्यांच्या निस्वार्थ सेवेमुळे गावात सकारात्मक बदल घडवून आणला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.