नवरात्रीनिमित्त 'यिन' महा क्लब च्या वतीने भौतिकोपचार शिबिराचे आयोजन.

नवरात्रीनिमित्त 'यिन' महा क्लब च्या वतीने भौतिकोपचार शिबिराचे आयोजन.
नवरात्रीनिमित्त यिन महा क्लब च्या वतीने भौतिकोपचार शिबिराचे आयोजन.

पुणे, २३ - सकाळ माध्यम समूहाच्या यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क (यिन) आणि मॉडर्न कॉलेज ऑफ फिजिओथेरपी यांच्या संयुक्त विद्यमाने भौतिकोपचार शिबिराचे आयोजन ग्रामदेवता तांबडी जोगेश्वरी मंदिर ट्रस्ट येथे करण्यात आले होते.

नवरात्रीनिमित्त पुण्याच्या विविध भागातून येणाऱ्या भाविक भक्तांची सेवा करण्याच्या दृष्टीने तसेच भक्तांना जाणवणाऱ्या विविध समस्यांवर उपाय करण्यासाठी या शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात 100 हुन अधिक भाविकांनी सहभाग नोंदवला.

या शिबिराला ओंकार भुजबळ, हर्षकेश देशमाने, साक्षी मोरणकर, मनाली देशपांडे, श्रावणी दिगुळे, अजिंक्य थिटे, प्रज्ञा गभाले, साक्षी पवार, भाग्यश्री मुटकुले, ऋतुजा ठिगळे, धनश्री वासकर, सोहम दरेकर तसेच यिन महा क्लब चे सदस्य उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com