झूम : अपडेटेड व्हर्जनसोबत राईड

प्रणीत पवार
Thursday, 28 January 2021

नववर्षात विविध कार कंपन्या नवीन कारसोबतच जुन्या कारचे ‘अपडेटेड व्हर्जन’ बाजारात आणणार आहेत. त्यात मोठ्या प्रमाणात एसयूव्ही प्रकारातल्या कार लाँच होणार आहेत. सध्या एमजीची हेक्‍टर, टोयोटा फॉर्च्युनर आदी एसयूव्ही सेगमेंटमधील कार नव्याने दाखलही झाल्या. तर, टाटाची लोकप्रिय ‘सफारी’ प्रजासत्ताकदिनी लाँच झाली असून, लवकरच लक्‍झरी लुकमध्ये ती रस्त्यावर धावताना दिसणार आहे.

नववर्षात विविध कार कंपन्या नवीन कारसोबतच जुन्या कारचे ‘अपडेटेड व्हर्जन’ बाजारात आणणार आहेत. त्यात मोठ्या प्रमाणात एसयूव्ही प्रकारातल्या कार लाँच होणार आहेत. सध्या एमजीची हेक्‍टर, टोयोटा फॉर्च्युनर आदी एसयूव्ही सेगमेंटमधील कार नव्याने दाखलही झाल्या. तर, टाटाची लोकप्रिय ‘सफारी’ प्रजासत्ताकदिनी लाँच झाली असून, लवकरच लक्‍झरी लुकमध्ये ती रस्त्यावर धावताना दिसणार आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

एमजीची ‘हेक्‍टर प्लस’
एमजीने नवी ‘हेक्‍टर प्लस २०२१’ नुकताच लॉंच केली आहे. ती ५, ६, ७ आसनव्यवस्थेत उपलब्ध आहे. या हेक्‍टरमध्ये ‘आयस्मार्ट’ची सुविधा अपग्रेड करण्यात आली आहे. यात ३५ पेक्षा जास्त ‘हिंग्लिश’ व्हॉईस कमांड्‌स दिल्या असून, ६०+ कनेक्‍टेड फीचर्स आहेत. त्यात ऍ‘पल वॉच’वर आयस्मार्ट ॲप, गाना ॲपमध्ये व्हॉईस सर्च, वायफाय कनेक्‍टिव्हिटी, ॲक्‍युवेदरद्वारे हवामानाचा अंदाज अशा अनेक गोष्टींचा समावेश आहे. तसेच, २५पेक्षा जास्त सुरक्षिततेच्या सुविधा आहेत. त्यात इलेक्‍ट्रॉनिक स्टॅबिलिटी प्रोग्राम, ट्रॅक्‍शन कंट्रोल, हिल होल्ड कंट्रोल, रिअर वायपर व वॉशर तसेच रिअर डी-फॉगर इत्यादींचा समावेश आहे.

इंजिन
हेक्‍टरमध्ये पेट्रोल आणि डिझेल दोन्ही पर्यायांमध्ये उपलब्ध असेल. हेक्‍टरचे पेट्रोल आणि पेट्रोल हायब्रीड इंजिन १४१ बीएचपी ताकद, २५० एनएम टॉर्क जेनरेट करते. तसेच ६-स्पीड मॅन्युअल गिअर बॉक्‍सबरोबरच डीसीटी ऑटोमॅटिकचा पर्यायही हेक्‍टरमध्ये देण्यात आला आहे. डिझेल इंजिन १६८ बीएचपी ताकद आणि ५५० एनएम टॉर्क निर्माण करते. त्याचबरोबर ६-स्पीड मॅन्युअल गिअर बॉक्‍समध्येही हेक्‍टर प्लस उपलब्ध असणार आहे.

किंमत
हेक्‍टर ५ सीटर : १२.८९ लाखांपासून पुढे
हेक्‍टर प्लस ६ सीटर : १५.९९ लाखांपासून पुढे
हेक्‍टर प्लस ७ सीटर : १३.३४ लाखांपासून पुढे

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

टोयोटाची ‘फॉर्च्युनर’
टोयोटाने फॉर्च्युनर अपग्रेड करत लॉंच केली असून, अधिक ऍग्रेसिव्ह सुप्रिम मॉडेल ‘लिजेंडर’ बाजारात आणले आहे. या दोन्ही फॉर्च्युनर अधिक पॉवरफुल, स्पोर्टिव्ह आणि आधुनिक फिचर्ससह आहेत. फॉर्च्युनरमध्ये नवीन हेडलॅम्प, एलईडी टेललॅम्प, १८ इंचीचे ऍलॉय व्हिल, मोठे फ्रंट ग्रिल आणि बंपर नवीन प्रकारात दिले आहेत, तसेच ८.० इंचाचा कनेक्‍टेड फिचर्ससह टचस्क्रीन इन्फोटेन्मेंट सिस्टिम देण्यात आली आहे, जो ऍपल कार प्ले आणि अँड्रॉईड सिस्टिमला सपोर्ट करतो. शिवाय सिट व्हेंटिलेशन सिस्टिम, जेबीएलचे ११ स्पिकरही आहेत. दोन्ही फॉर्च्युनरमध्ये ईको, नॉर्मल, स्पोर्ट रायडिंग मोड असतील. 

इंजिन
नवीन टोयोटा फॉर्च्युनरमध्ये २.८ लिटरचे टर्बो डिझेल इंजिन असून ते २०४ बीएचपी पॉवर आणि ५०० एनएमचा टॉर्क निर्माण करते. टोयोटाने फॉर्च्युनरला २.७ लिटर पेट्रोल इंजिनचा पर्यायही दिला आहे. फॉर्च्युनर पेट्रोल इंजिनमध्ये १६६ बीएचपी पॉवर, २४५ एनएम टॉर्क आहे. या दोन्ही फॉर्च्युनर मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक गिअर पर्यायांमध्ये उपलब्ध आहेत. दरम्यान, ‘ऑल व्हील ड्राईव्ह’चा पर्याय केवळ डिझेल इंजिनमध्येच देण्यात आला आहे.

किंमत
फॉर्च्युनर : २९.९८ लाखांपासून पुढे
फॉर्च्युनर लिजेंडर : ३७.५८ लाखांपासून पुढे.

टाटा ‘सफारी’
टाटाच्या हॅरीयरसारखाच लुक असणारी, परंतु जुन्याच कारचे अपडेटेड व्हर्जन असलेली नवी ७ सिटर ‘सफारी’ टाटाने पुन्हा लॉंच केली आहे. समोरून ‘हॅरीयर’सारख्याच दिसणाऱ्या सफारीमध्ये  टाटाने अनेक बदल केले आहेत. पाठीमागील बम्पर, नवीन टेल लॅम्प, लांबी आणि उंचीत वाढ केली आहे. सफारीचा डॅशबोर्ड हॅरीयरसारखाच असून, इलेक्‍ट्रिक ऍडजस्टेबल ड्रायव्हर सिट, ८.८ इंचीचा फ्लोटिंग टचस्क्रीन इंफोटेन्मेंट सिस्टम, किलेस एंट्री, सनरूफ, पॉवर टेलगेट, जेबीएल साऊंड सिस्टम आणि पुश-बटन स्टार्टसारखे ॲडव्हान्स फीचर्स सफारीत मिळतील. प्रजासत्ताक दिनी ही ‘सफारी’ लाँच करण्यात आली आहे.

इंजिन
सफारीत २.० लिटर, ४ सिलिंरडरचे क्रायोटेक डिझेल इंजिन, १६८ बीएचपी ताकद, ३५० एनएम टॉर्क जनरेट होईल. तसेच, ६-स्पिड मॅन्युअल, ६- स्पिड टॉर्क कन्व्हर्टर स्वयंचलित गिअर बॉक्‍सही देण्यात आला आहे. सफारी १.५ लिटर टर्बो पेट्रोल इंजिनमध्येही आणण्याच्या तयारीत आहे. 

किंमत
बेसिक मॉडेल : १५ लाख
टॉप मॉडेल : २१ लाख

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pranit Pawar Writes about old car updated version