esakal | झूम : टायर ‘सलामत’ तो सफर ‘सुहाना’
sakal

बोलून बातमी शोधा

Tyre

झूम : टायर ‘सलामत’ तो सफर ‘सुहाना’

sakal_logo
By
प्रणीत पवार

टायर हे सर्व प्रकारच्या रस्त्यांशी संपर्कात येतात. त्यामुळे नवीन टायर घेण्यापूर्वी टायरचा साईज, त्याचे डिझाईन, गुणवत्ता आदींचे निरीक्षण करणे गरजेचे आहे. बहुतांश टायर नैसर्गिक (प्राकृतिक) रबराऐवजी सिंथेटिक अर्थात कृत्रिम रबरापासून बनलेले असतात. परंतु, भारतात बहुतांश कंपन्या नैसर्गिक रबरापासून टायरची निर्मिती करतात. कारण भारतात रबराचे उत्पादन होते आणि कंपन्यांना कृत्रिम रबराऐवजी नैसर्गिक रबराचा वापर करणे आर्थिकदृष्ट्या परवडते. कृत्रिम रबराचे अनेक फायदे आहेत. हे रबर नैसर्गिक रबरापेक्षा जास्त टिकाऊ असतो. वाहन फिरण्यासाठी टिकाऊ टायरची आवश्‍यकता असते. त्यामुळे नैसर्गिक रबराचा वापर केला जात नाही. वाहनाच्या वजनानुसार रस्त्यावर निर्माण होणाऱ्या दबावाचा भार सोसण्यासाठी नैसर्गिक रबरापासून बनलेले टायर उपयुक्त नसतात. त्यामुळे वाहनासाठी टायर निवडताना ते कृत्रिम रबरापासून बनवलेले आहेत, की नैसर्गिक रबरापासून, हे तपासून घेणे गरजेचे आहे.

बदलांमुळे नुकसान

वाहनांच्या प्रकारानुसार कंपन्यांकडून त्या-त्या आकाराचे टायर बसवलेले असतात. वाहनाचे रिंगही त्या आकाराला अनुसरून असतात. परंतु, हल्ली स्टाईलच्या जमान्यात वाहनप्रेमी कंपन्यांनी दिलेल्या टायर, रिंगमध्ये बदल करतात. यात ॲलॉय व्हील, अधिक रुंद किंवा मोठ्या आकाराचे टायर बसवले जातात. परंतु वाहनाच्या दृष्टीने या अतिरिक्त बाबी नुकसानकारक ठरतात. गाडीचे मायलेज कमी होणे, चाकांची अलाईन्मेंट (संरेखन) यांमुळे बिघडते.

टायरसाठीही नियमावली येणार!

  • जगभरातील सर्वाधिक रस्ते अपघात भारतात होतात. रस्ते दुर्घटनांपैकी फक्त भारतात जगातील सर्वाधिक ११ टक्के मृत्यू होतात. हा मृत्यूदर कमी करण्यासाठी केंद्रीय वाहतूक मंत्रालयाने २०१९मध्ये मोटर वाहन कायदा आणला होता. तसेच, वाहतुकीचे नियम कठोर करून, अपघात कमी करणे, इंधन वाचवणे या उद्देशाने २०२१मध्ये वाहनांच्या टायरबाबत नियमावलीचा प्रस्ताव ठेवला. एकूणच, टायर्ससंबंधी नवा नियम १ ऑक्टोबर २०२१ पासून लागू होण्याची शक्यता आहे.

  • टायरचे घर्षण, ओल्या रस्त्यावरील टायरची ग्रीप आणि त्यातून होणारा आवाज याबाबत नवा मसुदा तयार केला आहे. यामध्ये भारतात विकल्या जाणाऱ्या टायरना काही परीक्षांतून जावे लागेल. खराब किंवा गुळगुळीत टायरमध्ये रस्त्यावरील पकड कमी होते. शिवाय याचा परिणाम वाहनाच्या मायलेजवरही होतो. या सर्व बाबींमुळे कार, बस आणि ट्रक आदी वाहनांचे टायर विश्वासार्ह असावे, असे या मसुद्यात नमूद आहे.

  • भारतात अनेक टायर कंपन्या टायर बनवतात. या टायरना गुणवत्तेसाठी बीआयएस (ब्युरो ऑफ इंडियन स्टॅण्डर्ड्स) नियम आहे. परंतु ग्राहकांना अशी माहिती मिळत नाही. त्यामुळे सरकार टायरसाठी रेटिंग सिस्टम आणण्याची तयारी करत आहे.

loading image