esakal | गप्पा ‘पोष्टी’ : ‘सर्च’चे साइडइफेक्ट्स!

बोलून बातमी शोधा

Google}

‘फेब्रुवारी महिन्यामध्येच २८ दिवस का असतात?’ असा प्रश्न उगाचंच मनात आला. खरंतर हा पूर्णपणे बिनकामाचा प्रश्न आहे! आय मीन, ह्याचा रोजच्या कामामध्ये काहीही उपयोग नाही. असा प्रश्न गुगलपूर्व काळामध्ये पडला असता, तर त्याकडं पूर्णपणे दुर्लक्ष केलं गेलं असतं!

गप्पा ‘पोष्टी’ : ‘सर्च’चे साइडइफेक्ट्स!
sakal_logo
By
प्रसाद शिरगावकर

‘फेब्रुवारी महिन्यामध्येच २८ दिवस का असतात?’ असा प्रश्न उगाचंच मनात आला. खरंतर हा पूर्णपणे बिनकामाचा प्रश्न आहे! आय मीन, ह्याचा रोजच्या कामामध्ये काहीही उपयोग नाही. असा प्रश्न गुगलपूर्व काळामध्ये पडला असता, तर त्याकडं पूर्णपणे दुर्लक्ष केलं गेलं असतं! मात्र सध्याच्या या गुगलयुगामध्ये गुगल सतत तुमच्या खिशात असल्यानं, अशा कुठल्याही बिनकामाच्या प्रश्नाचं उत्तर लगेच गूगलवर शोधता येतं. मीसुद्धा तेच केलं, ‘फेब्रुवारी महिन्यामध्येच २८ दिवस का?’ असा प्रश्न गुगलला विचारला. अर्थातच, प्रश्न विचारता क्षणी त्याची पानभर उत्तरंही मिळाली! ती उत्तरं आता इथे सविस्तरपणे सांगत बसत नाही, पण साधारणपणे रोमन साम्राज्याच्या दुसऱ्या सम्राटाच्या काळात वापरल्या जाणाऱ्या कॅलेंडरविषयी अत्यंत रोचक, पण संपूर्णपणे निरुपयोगी माहिती मला मिळाली.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

तर, माहितीच्या महास्फोटाच्या ह्या गुगलयुगात जगातली कोणतीही माहिती कोणालाही कधीही शोधता येऊ शकते. मनातल्या कोणत्याही प्रश्नाचं उत्तर गुगलवर शोधलं तर त्यावर हजारो उत्तरं मिळतात. पण, मुळात बरेच प्रश्न बिनकामाचे असू शकतात अन् उत्तरं निरुपयोगी, याचा आपण विचारच करत नाही! आपल्या पारंपारिक समजुतीनुसार जगाविषयी जिज्ञासा असणं चांगलं समजलं जातं. प्रश्न पडणं अन् त्यांची उत्तरं शोधाविशी वाटणं हे ज्ञानसाधनेचं लक्षण मानलं जातं. माहितीची अन् ज्ञानाची साधनं मर्यादित होती, कोणत्याही प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी खूप कष्ट घ्यावे लागायचे, तेव्हा मनात येणाऱ्या प्रश्नांना आपोआप चाळणी लावली जायची. काय महत्त्वाचं अन् काय दुय्यम याची उतरती भाजणी लावली जायची. महत्त्वाचं अन् अधिक प्राधान्य असलेलं वाटतं त्याचीच उत्तरं शोधायचा प्रयत्न केला जायचा. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

सदैव सर्वत्र उपलब्ध असलेल्या अन् चटकन शोधता येऊ शकणाऱ्या माहितीच्या महापुरामुळं दोन अत्यंत टोकाच्या गोष्टी घडत आहेत. एक म्हणजे कोणताही प्रश्न पडला की तो महत्त्वाचा आणि आयुष्यात प्राधान्य असलेला आहे का नाही, याचा विचार न करता तातडीनं त्याचं उत्तर शोधायला जाणं. हे एकवेळ ठीक, पण हा शोध घेतल्यावर पुढच्या काही सेकंदात हेच त्या विषयावरचं ‘ज्ञान’ आहे, हे समजून चालणं ही धोकादायक गोष्ट घडते. या सवयीतून जगातल्या सगळ्याच विषयातलं सगळंच आपल्याला समजतं, अशी स्वतःची समजूत करून घेणारे ‘विकि’पंडित तयार होत आहेत! अन् दुसरी टोकाची गोष्ट म्हणजे हवी ती माहिती कधीही उपलब्ध होऊ शकते याची खात्री असल्यानं अगदी आपल्या अभ्यासाच्या विषयाचीही पुरेशी माहिती न ठेवणं, लागलं तर गुगलवर बघून सांगू असा आत्मविश्वास (?) असलेले ‘कॉपीपेस्ट’ मास्टरही तयार होत आहेत.  

ह्या दोन्हीतला समान धागा म्हणजे, माहिती आणि ज्ञान ह्यात फरक समजणं. अन् हा माहितीच्या महास्फोटाचा सगळ्यांत मोठा साइडइफेक्ट!!

Edited By - Prashant Patil