esakal | डिजिटल साक्षरतेचे एक नवे पर्व आत्मबोध
sakal

बोलून बातमी शोधा

डिजिटल साक्षरतेचे एक नवे पर्व - आत्मबोध

गृहिणी आणि ज्येष्ठ नागरिक, यांना मोबाईल तथा संगणकाचे मूलभूत ज्ञान जसे व्हिडिओ कॉल, गूगल सर्च, गूगल मॅप, सोशल मीडिया, ऑनलाईन खरेदी, तिकीट बुकिंग अशा अनेक गोष्टी शिकवल्या जातात

डिजिटल साक्षरतेचे एक नवे पर्व - आत्मबोध

sakal_logo
By
टीम YIN युवा

पुणे येथील विश्वकर्मा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या सोशल वेल्फेअर अॅण्ड डेव्हलपमेंट कमिटी द्वारे गृहीणी व ज्येष्ठ नागरिकांना आत्मनिर्भर तथा तंत्रस्नेही बनवण्याच्या दृष्टिकोनातून दरवर्षी आत्मबोध हा उपक्रम राबवला जातो. कोविड-19 च्या प्रादुर्भावामुळे गतवर्षी प्रमाणे यावर्षी सुद्धा आत्मबोध चे आयोजन ऑनलाईन करण्यात येत आहे. आत्मबोध हा एक मोफत डिजिटल साक्षरतेचा उपक्रम आहे. आत्मबोध चे तिसावे पर्व यावर्षी पूर्णत्वास येत आहे.

या कार्यक्रमात गृहिणी आणि ज्येष्ठ नागरिक, यांना मोबाईल तथा संगणकाचे मूलभूत ज्ञान जसे व्हिडिओ कॉल, गूगल सर्च, गूगल मॅप, सोशल मीडिया, ऑनलाईन खरेदी, तिकीट बुकिंग अशा अनेक गोष्टी शिकवल्या जातात. दरवर्षी या कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो. समाजातील प्रत्येक घटकास तंत्रज्ञानाचे मूलभूत स्वरूप माहिती असावे आणि त्यांना ते योग्यरित्या वापरता यावे अशी इच्छा विश्वकर्मा अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची आहे आणि त्यासाठीच एस. डब्ल्यू. अँड डी. कमिटीचे विद्यार्थी अहोरात्र परिश्रम घेत आहेत. प्रभारी प्राध्यापक गोडबोले मॅडम यांच्या सतत मार्गदर्शनासह, प्रत्येक समन्वयक आणि उपक्रम प्रमुखांच्या सतत समर्थनासह हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडला जातो.

या वर्षी दि. २१ सप्टें.२०२१ ते ३ ऑक्टो. २०२१, संध्याकाळी ६ ते ८ या दरम्यान आत्मबोध चे आयोजन करण्यात येत आहे. सदर उपक्रमामध्ये सहभागी आणि स्वयंसेवक असे दोन गट असतील. नवीन तंत्रज्ञानाचा वापर कसा करावा, हे स्वयंसेवक सहभागी सदस्यांना शिकवतील. दि. ७ ते १५ सप्टें. च्या कालावधी दरम्यान स्वयंसेवक म्हणून नोंदणी करता येईल, तसेच दि. ११ ते १७ सप्टें दरम्यान सहभागी म्हणून नोंदणी करता येईल.

आत्मबोध हा उपक्रम केवळ विश्वकर्मा अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी मर्यादित नाही, तर समाजाला पुढे नेण्यासाठी कार्य करू इच्छिणारे सर्व या उपक्रमाचा भाग होऊ शकतात.

खालील दिलेला Q.R. कोड मोबाईल द्वारे स्कॅन करून आमच्या वेबसाईट वरून नाव नोंदणी करावी, या उपक्रमाचा लाभ कोणीही घेऊ शकते.

आत्मबोध

आत्मबोध

कमिटीचा असा विश्वास आहे की या कार्यक्रमामुळे सर्व सहभागी लोकांच्या जीवनात सकारात्मकता, आशा व आकांक्षा यांची जाणीव निर्माण होईल.

loading image
go to top