गोष्ट मैत्रीची... : शेवटपर्यंत लढायला शिकलो...

राजरत्न वि. पठारे
Thursday, 21 January 2021

मी २०१२ ला औरंगाबादच्या देवगिरी अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रवेश घेतला. मी गावाकडचा साधा विद्यार्थी होतो. माझा आत्मविश्वास जरा बेताचाच होता; पण मी विद्यालयात रुळल्यावर कुशल नावंधर नावाचा माझा एक मित्र बनला. तो खूप बिनधास्त स्वभावाचा होता. मला त्याने पहिल्या सेमिस्टरमध्ये त्याच्या प्रेझेंटेशन टीममध्ये घेतलं. माझ्याकडून चांगली तयारी करून घेतली.

मी २०१२ ला औरंगाबादच्या देवगिरी अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रवेश घेतला. मी गावाकडचा साधा विद्यार्थी होतो. माझा आत्मविश्वास जरा बेताचाच होता; पण मी विद्यालयात रुळल्यावर कुशल नावंधर नावाचा माझा एक मित्र बनला. तो खूप बिनधास्त स्वभावाचा होता. मला त्याने पहिल्या सेमिस्टरमध्ये त्याच्या प्रेझेंटेशन टीममध्ये घेतलं. माझ्याकडून चांगली तयारी करून घेतली. प्रेझेंटेशन संपल्यास पूर्ण वर्गात माझी स्वत:ची एक वेगळी ओळख तयार झाली आणि ती ओळख आजतागायत कायम आहे. पुढं एक प्रसंग असा घडला, की आम्ही शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात एका स्पर्धेत भाग घेतला. दोन-दोन मुलांचा एक ग्रुप होता. कुशल आणि मी दोघे वेगवेगळ्या ग्रुपमध्ये होतो. स्पर्धा होती ती कागदापासून हलका, पण मजबूत पूल तयार करायची.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

औरंगाबादच्या सर्व अभियांत्रिकी महाविद्यालयांचे जवळपास २०० ते २५० संघ त्यात सहभागी झाले होते. विविध एफएम चॅनेलचे प्रतिनिधी, तसेच वर्तमानपत्रांचे प्रतिनिधीही उपस्थित होते. कुशलचा पूल नीट उभा राहातही नव्हता, पण तरी तो स्पर्धेच्या शेवटच्या क्षणापर्यत थांबला होता; स्वतःसाठीही आणि आमच्यासाठीही. माझ्या संघाचा पहिला नंबर आला. आमचे फोटे दोन-तीन वृत्तपत्रांत आले. खरंतर मी त्या स्पर्धेला येणारच नव्हतो, पण मला कुशलनं आग्रह करून बोलावलं होतं, म्हणून मी सहभागी. मी त्यावेळेस त्याच्याकडून एक गोष्ट शिकलो, ती म्हणजे स्पर्धेत शेवटपर्यंत हार मानायची नसते. 

पुढं मी त्याच्याबरोबर अनेक स्पर्धांमध्ये सहभागी झालो. काहींमध्ये हरलो, तर काहींमध्ये जिंकलो, अगदी पहिल्या क्रमांकानंही...मात्र, प्रत्येक स्पर्धेत काहीतरी नवीन शिकलो. कुशलनं माझी सुरवातीच्या काळात ओळख निर्माण करण्यात केलेल्या मदतीमुळं मी नंतरच्या काळात नेहमी चांगल्या मित्रसंघात राहिलो.

आवाहन
मैत्री, दोस्ती हे शब्दच जीवनाला ताजंतवानं करणारे. प्रत्येकाला जीवनाच्या कोणत्या तरी टप्प्यावर उत्तम मैत्र सापडतंच. कधी बालवाडीतला चिमुकला मित्र किंवा मैत्रीण, नंतर कायमचा मैत्रबंध जुळवतो; तर कधी अगदी मोठं झाल्यावरही जिवलग दोस्त सापडतो, उत्तम मैत्रीण सापडते. अनेकांकडे या मैत्रीची अगदी विलक्षण अशी गोष्ट असते. तुमच्याकडे आहे अशी गोष्ट? तर मग आम्हाला ती नक्की कळवा. तुमचं जीवन किंवा जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलणाऱ्या या मैत्रीची गोष्ट आम्हाला खाली दिलेल्या ई-मेल आयडीवर पाठवा. अट एकच, तुमचे वय चाळिशीपेक्षा अधिक नको व शब्दसंख्या दोनशेपेक्षा जास्त नको. 
jallosh@esakal.com

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rajratna Pathare Writes about Friendship