तंत्रज्ञानात भन्नाट अपडेट्स 

ऋषिराज तायडे 
बुधवार, 27 मे 2020

तंत्रज्ञान क्षेत्रात अनेक घडामोडी घडताना दिसत आहे. लॉकडाउनमध्येही तंत्रज्ञान क्षेत्रातील काही कंपन्यांनी त्यांची उत्पादने बाजारात आणली जात आहे, शिवाय काही नवे अपडेट्सही सादर केली जात आहेत.

देशात सर्वत्र लॉकडाउन असतानाही अर्थव्यवस्था हळूहळू रुळावर येताना दिसत आहे. केंद्र सरकारकडूनही तशा हालचाली सुरू आहेत. त्यातूनच तंत्रज्ञान क्षेत्रात अनेक घडामोडी घडताना दिसत आहे. लॉकडाउनमध्येही तंत्रज्ञान क्षेत्रातील काही कंपन्यांनी त्यांची उत्पादने बाजारात आणली जात आहे, शिवाय काही नवे अपडेट्सही सादर केली जात आहेत. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

नवीन ‘विवो व्ही १९’ 
ग्लोबल स्मार्टफोन ब्रँड विवोने आपल्या कॅमेरा केंद्रित व्ही-सीरिज पोर्टफोलिओ अंतर्गत नवीन ‘विवो व्ही १९’ मोबाईल सादर केला आहे. ‘व्ही १९’मध्ये ३२+८ मेगापिक्सलचा ड्युअल फ्रंट कॅमेरा दिला असून, त्यातून सुपर वाइड सेल्फीसह संस्मरणीय क्षण कॅमेराबद्ध करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. तसेच, ‘व्ही १९’मध्ये ४८ मेगापिक्सल आर्टिफिशियल इंटिलिजन्सने परिपूर्ण क्वॉड बॅक-कॅमेरा सेटअप आहे. एलआयव्ही (ई ३) सुपर अमोलेड एफएचडी + स्क्रीन आणि ड्युअल-आय व्यू डिस्प्ले असलेला हा मोबाईल व्हिवो फ्लॅश चार्ज २.० तंत्रज्ञानाने सुसज्ज आहे. ८ + १२८ जीबी मोबाईल २७,९९० रुपये आणि ८ + २५६ जीबी मोबाईल ३१,९९० रुपयांना ई-कॉमर्स संकेतस्थळांवर विक्रीसाठी उपलब्ध आहे. 

इन्स्टाग्रामवरून ५० जणांना व्हिडिओ कॉल 
लॉकडाउनच्या काळात अनेक कंपन्यांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होमची मुभा दिली आहे. दरम्यान, या काळात ज्यांचे वर्क फ्रॉम होम सुरू आहे किंवा जे आप्तेष्टांपासून दूर आहेत, ते व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून एकमेकांच्या संपर्कात आहेत. व्हिडिओ कॉलसाठी अनेक प्लॅटफॉर्म्स उपलब्ध झाले आहेत. त्यासाठी त्यांनी नवनवे अपडेट देत एकाचवेळी अनेकांशी संवाद साधता येईल, याबाबत प्रयत्न सुरू आहे. काही दिवसांपूर्वी फेसबुकने मेसेंजर रूम्स सादर केले होते, ज्यामध्ये ५० लोकांना एकाच वेळी व्हिडिओ कॉल करणे शक्य होते. त्याचप्रमाणे मेसेंजर रूम्सचे नवी प्रणाली लवकरच व्हॉट्सअ‍ॅपमध्येही उपलब्ध होणार आहे. म्हणजेच व्हॉट्सअ‍ॅपवर एकाचवेळी ५० जण व्हिडिओ कॉलवर संवाद साधणे शक्य होणार आहे. मात्र व्हॉट्सअ‍ॅपआधी हे फीचर इन्स्टाग्रामने सुरू केले. इन्स्टाग्रामने त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून याबाबत माहिती दिली आहे. इन्स्टाग्रामचे अ‍ॅप अपडेट केल्यानंतर मेसेंजर रुममधून व्हिडिओ कॉन्फरन्सिंग करता येणार आहे. सध्या हे फीचर बीटा आवृत्तीत असून, लवकरच अॅण्ड्रॉईड आणि आयओएस प्रणालीवर उपलब्ध होईल. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

‘सोशल डिस्टन्सिंग’साठी रिस्टबॅण्ड 
तुमच्या-आमच्या आरोग्याची माहिती देणारे अनेक फिटबॅण्ड अनेकांकडे असतील. आता मात्र कोरोनाच्या संकटात तुम्हाला सोशल डिस्टन्सिंगचे पालन करण्यासाठी सूचना देणारे अनोखे रिस्टबॅण्ड तयार करण्यात आले आहे. सध्या सोशल डिस्टन्सिंग हा कोरोनापासून बचाव करण्याचा प्रभावी मार्ग आहे. त्यामुळे तुम्ही बाहेर गेल्यास किंवा गर्दीत गेल्यास सोशल डिस्टन्सिंग पाळण्यास आठवण करून देईल. कॅनडाच्या एका कंपनीने तयार केलेले रिस्टबॅण्ड घातल्यावर २ व्यक्ती ६ फूटांपेक्षा कमी अंतरावर एकमेकांच्या जवळ आल्यास त्यांना अलार्म किंवा फ्लॅशच्या माध्यमातून सावधानतेचा इशारा देईल. या पार्श्‍वभूमीवर फिटबॅण्ड तयार करणाऱ्या अनेक कंपन्यांनी त्यांच्या बॅण्डमध्ये सोशल डिस्टन्सिंगचा इशारा देणारे फीचर समाविष्ट करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Technology companies are introducing new updates to their products in lockdown