यिन निवडणूकीत उमेदवारांच्या नोंदणीचा वाढला वेग

यिन नेतृत्व विकास कार्यक्रम २०२४.
यिन निवडणुकीच्या पोस्टरचे अनावरण  करताना सर्व प्राचार्य व इतर अधिकारी
यिन निवडणुकीच्या पोस्टरचे अनावरण करताना सर्व प्राचार्य व इतर अधिकारी

भिगवण, ता. २८ : 'सकाळ' माध्यम समूह आयोजित नेतृत्व विकास कार्यक्रमांतर्गत 'यिन'च्या महाविद्यालयीन निवडणुकीच्या ऑनलाईन उमेदवार नोंदणीची गती वाढली आहे. दत्तकला शिक्षण संस्थेमधील मुख्य प्रशासकीय अधिकारी डॉ. विशाल बाबर, इन्स्टिट्युट ऑफ फार्मासिटिकल सायन्स अँड रिसर्च (फॉर गर्ल्स) महाविद्यालयाच्या प्राचार्य ज्योती जावळे, अनुसया कॉलेज ऑफ फार्मसीचे प्राचार्य अमित पोंदकुले, दत्तकला ग्रुप ऑफ इंस्टीट्यूशनचे प्राचार्य श्रीकांत साळुंखे, दत्तकला कॉलेज ऑफ फार्मसीचे प्रमोद शिरोटे, महाराष्ट्र राज्याचे यिनचे समन्वय अधिकारी अनिकेत मोरे यांनी निवडणुकीचे पोस्टर अनावरण करून संस्थेतील विद्यार्थ्यांना नेतृत्व विकासाची संधी उपलब्ध करून दिली आहे. पहिल्या टप्प्यातील मतदार नोंदणी निवडणुकीच्या आधी चार दिवसापर्यंत चालणार आहे. तर मतदान १२ जानेवारी २०२४ ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. विद्यार्थ्यांची महाविद्यालयीन परीक्षा आणि त्यानंतर असणाऱ्या सुट्ट्या या सर्वांचा विचार करून निवडणुकी दिवशी ज्या ठिकाणी विद्यार्थी असेल तेथूनच त्याला 'यिन'च्या ॲप वरून मतदान करता यावे, असा विचार करून यावर्षी ही प्रक्रिया ऑनलाईन प्रकारे घेण्यात येत आहे. विद्यार्थ्यांनी महाविद्यालयातूनच नेतृत्व विकसित केले पाहिजे. नेतृत्व आयुष्याच्या प्रवासासाठी सर्व ठिकाणी उपयुक्त ठरते असे मत संस्थेच्या सचिव माया झोळ यांनी व्यक्त करत 'यिन'च्या निवडणुकीसाठी उमेदवारांना शुभेच्छा दिल्या.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com