ट्रिनिटी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे रासेयो चे विशेष श्रमसंस्कार शिबिर संपन्न. | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ट्रिनिटी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे रासेयो चे  विशेष श्रमसंस्कार शिबिर संपन्न.

ट्रिनिटी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे रासेयो चे विशेष श्रमसंस्कार शिबिर संपन्न.

कोंढवा येथील के. जे. शैक्षणिक संकुलाचे ट्रिनिटी अभियांत्रिकी व संशोधन महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेचे विशेष हिवाळी श्रमसंस्कार शिबिर ८ ते १५ फेब्रुवारी या दरम्यान करंदी (खे.बा.) ता. भोर येथे नुकतेच संपन्न झाले. या शिबिरांत युवकांचा ध्यास - ग्राम शहर विकास या उपक्रमांतर्गत ग्राम स्वच्छता, व्यसनमुक्ती जनजागृती, शालेय विद्यार्थ्यांना मार्गदर्शन, चि. साहिल भामे याचे शिवचरित्र, श्री. संदेश मोरे यांचे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन यावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. जिल्हा परिषद शाळेतील परिसरात वर्गाबाहेर प्रांगणात इंग्लिश अल्फाबेट व मराठी बाराखडी पेंट करण्यात आली आहे. १०० सिमेंटची रिकामी गोणी वापरून वाळू व माती भरून वनराई बंधारा देखील बांधण्यात आला. याचा उपयोग चरण्यास येणाऱ्या गुरांना तसेच जंगली प्राण्यांना पाणी पिण्यासाठी होणार आहे. याच महाविद्यालयाने २०१६ साली देखील असेच विविध उपक्रम व वनराई बंधारा बांधला होता. तसेच आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यात ग्रामस्थांच्या विविध रोगाचे निदान करून त्यावर मोफत औषध वाटप देखील करण्यात आले. सदरील शिबिराचे आयोजन भारती आयुर्वेदिक दवाखाना यांच्या मदतीने आयोजित करण्यात आले होते. आरोग्य शिबिरास डॉ. अमोल पाटील यांचे मोलाचे सहकार्य लाभले

शिबिरांत गावातील पुरातन असे महादेवाचे मंदिर आहे, महाशिवरात्रीच्या निमित्ताने त्याच्या आजूबाजूचा परिसर स्वच्छ करून त्यास रंगरंगोटी करून सुशोभीत करण्याचे देखील काम करण्यात आले. शिबिराचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अभिजीत औटी, महाविद्यालयातील श्री. संतोष लिम्हण तसेच गावचे सरपंच श्री. नवनाथ गायकवाड, उपसरपंच श्री. प्रयाग गोळे, मा. सरपंच सौ. अलका तळेकर, शालेय व्यवस्थापण समिती अध्यक्ष सौ. सुप्रिया बोरगे, सामाजिक कार्यकर्ते श्री. नितीन बोरगे उपस्थित होते. सदरील शिबिरास महाविद्यालयातील रासेयोचा मा. स्वयंसेवक तसेच याच गावातील रहिवासी श्री. स्वप्नील सोपान बोरगे यांनी मोलाची मदत केली. यात तब्बल ५० मुलामुलींनी सहभाग नोंदविला असून हे शिबिर यशस्वी होण्याकरिता कार्यक्रम अधिकारी प्रा. जितेश धुळे, सहकार्यक्रम अधिकारी श्री. बाळासाहेब बडदे यांनी विशेष परिश्रम घेतले.