'सिद्धु, आपल्या मित्राला जरा समजवा...'

digvijaya singh
digvijaya singh

नवी दिल्लीः पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांना जरा समजवा, असा सल्ला काँग्रसचे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांनी काँग्रेसचे मंत्री नवज्योतसिंग सिद्धू यांना ट्विटरवरून दिला आहे.

इम्रान खान यांच्यावरून सिद्धू यांना अनेकदा टीकेला सामोरे जावे लागले आहे. एकापाठोपाठ एक ट्विट करत दिग्विजय सिंह यांनी सिद्धू यांना सल्ला देताना इम्रान खान यांना आव्हानही दिले. ते म्हणाले, 'पाकिस्तानचे श्रीमान पंतप्रधान कमऑन! हिम्मत दाखवा आणि हाफिज सईद व मसूद अझहर या दहशतवाद्यांच्या म्होरक्यांना भारताच्या स्वाधीन करा. असे केल्यास तुम्ही फक्त पाकिस्तानला आर्थिक संकटातून बाहेर काढण्यास सक्षम होणार नाही. उलट तुम्ही शांततेच्या नोबेल पुरस्काराचे प्रबळ दावेदारही ठराल.'

पुढच्या ट्विटरमध्ये नवज्योतसिंग सिद्धूंना टोला लगावताना म्हटले की, 'नवज्योतसिंग सिद्धू यांनी आपले मित्र इम्रान यांना समजावून सांगितले पाहिजे. त्यांच्यामुळे सिद्धूंना टीका सहन करावी लागत आहे.' पुढच्या ट्विटमध्ये ते म्हणाले, "मला माहीत आहे की, मोदी भक्त मला ट्रोल करणार. पण मला याची पर्वा नाही. क्रिकेटपटू म्हणून इम्रान मला पसंत आहेत. पण सध्या ते मुस्लिम कट्टरपंथीय आणि आयएसआय समर्थित गटाला पाठिंबा देत आहेत. माझा यावर अजूनही विश्वास बसत नाही.'

दरम्यान, आपल्या वक्तव्यामुळे नेहमी चर्चेत राहणारे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांनी काश्मीर मुद्यावरून आपल्याच पक्षाचे मंत्री नवज्योतसिंग सिद्धू यांच्यावर निशाणा साधला आहे. काश्मीर समस्येवर तोडगा काढण्यासाठी सर्व राजकीय पक्षांनी एकजुट होऊन एक आराखडा तयार करण्याची सूचनाही त्यांनी केली आहे. जम्मू-काश्मीरमधील पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानबाबत केलेल्या वक्तव्यामुळे सिद्धूंना टीकेचा सामना करावा लागला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com