काँग्रेसचे 'अमित शहा' कर्नाटकमध्ये सरकार वाचविणार?

DK Shivkumar
DK Shivkumar

बंगळूर : भाजपने कर्नाटकमध्ये सत्तांतरासाठी कंबर कसलेली असताना काँग्रेसमधील अमित शहा अशी ओळख असलेले किंगमेकर डी. शिवकुमार कर्नाटकातील काँग्रेसचे सरकार वाचविणार का? हा प्रश्न आहे. दोन अपक्ष आमदारांनी पाठिंबा काढल्याने काँग्रेस आणि धजद सरकार अडचणीत आले आहे.

भाजपकडून सुरु असलेल्या ‘ऑपरेशन कमळ’चे राजकीय नाट्य मुंबईत आकाराला येत असताना एका भाजपच्या उत्साही कार्यकर्त्यामुळेच बिंग फुटल्याचे उघड झाले. काँग्रेसमधून बंडखोरीच्या तयारीत असलेल्या तीन आमदारांना ज्या हॉटेलमध्ये ठेवले आहे त्याचा सुगावा लवकर लागल्याने काँग्रेसने देखील तातडीने हालचाली सुरू करत भाजपच्या अडचणी वाढवल्या आहेत. 

या आमदारांना बाहेर पडताना त्यांच्यावर पाळत ठेवण्याची जबाबदारी काँग्रेसने विश्‍वासू कार्यकर्त्यांवर सोपवली. काँग्रेसचे कर्नाटकमधील किंगमेकर डी. शिवकुमार यांनी तात्काळ हालचाली करत काँग्रेस बंडखोरांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. येडियुरप्पांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतरही भाजपला काँग्रेस आमदार फोडता आले नव्हते. शिवकुमार यांनी या आमदारांशी संपर्क साधत निर्वाणीचा इशारा दिला आहे. ते आज मुंबईत दाखल होणार असून, त्यानंतर बंडखोरांना भेटण्याचाही प्रयत्न करतील.

तेरा आमदार नॉट रिचेबल
काँग्रेसच्या सर्व आमदारांना फोनवरून उद्या (ता. १७) सायंकाळपर्यंत बंगळूरला येण्यास सांगण्यात आले आहे. काँग्रेसच्या सर्व आमदारांना फोनवरून तातडीने बंगळूरला येण्याच्या सूचना देण्यात आल्याचे समजते. परंतु १३ आमदारांचे दूरध्वनी क्रमांक नॉट रिचेबल येत असल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, उत्तर कर्नाटकातील आमदारांनी काँग्रेसचे प्रभारी वेणुगोपाल यांच्याविरोधातच तक्रार केली आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com