उत्तर प्रदेश ठरवेल पुढचा पंतप्रधान : मायावती

उत्तर प्रदेश ठरवेल पुढचा पंतप्रधान : मायावती

लखनौ : आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपचा पराभव करण्यासाठी सपा-बसपा एकत्र लढणार आहे. त्यामुळे हे दोन्ही पक्ष एकत्र आले आहेत. कोणता पक्ष सरकार स्थापन करेल आणि पंतप्रधानपदी कोण विराजमान होईल, याबाबत उत्तर प्रदेशातील जनताच ठरवेल, असे बहुजन समाज पक्षाच्या सर्वेसर्वा मायावती यांनी आज (मंगळवार) सांगितले.

मायावती त्यांच्या 63 व्या वाढदिवसानिमित्त बोलत होत्या. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांच्या मुद्यांवरून काँग्रेस आणि भाजपवर निशाणा साधला. त्या म्हणाल्या, ''भाजप आणि काँग्रेसने शेतकऱ्यांच्या गरजांकडे दुर्लक्ष केले आहे. मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड या राज्यांत कर्जमाफीचे आश्वासन दिले. मात्र, याचा फायदा शेतकऱ्यांना मिळणार नाही''. 

त्या पुढे म्हणाल्या, मायावती आणि समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी आगामी सर्वात्रिक निवडणुकीत आघाडी केली आहे, याबाबतची घोषणा त्यांनी 12 जानेवारीला केली आहे. यावर त्या म्हणाल्या, की ''सपा-बसपाची आघाडी भाजपची झोप उडवून टाकणार आहे. इतर ज्या राज्यात सपा-बसपा एकत्र लढणार आहे. त्या राज्यात भाजपचा पराभव करण्यासाठी ते एकत्र येणार आहेत. कोणता पक्ष सरकार स्थापन करेल आणि पंतप्रधानपदी कोण विराजमान होईल, याबाबत उत्तर प्रदेशातील जनताच ठरवेल''.

दरम्यान, सपा आणि बसपा आगामी लोकसभा निवडणुकीत एकत्र येत आहे. त्यामुळे या दोन्ही पक्षांमधील मागील सर्व फरक विसरण्याची आता गरज निर्माण झाली आहे. असे केल्यास हे माझ्यासाठी वाढदिवसाचे गिफ्ट असेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com