पणजी- गोव्यात विकल्या जाणाऱ्या मासळीमध्ये फॉर्मेलिनचा अंश अद्यापही आढळत असल्याची टीका गोवा कॉंग्रेसचे अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी केली आहे. ही टीका बालिश असून राज्यात विकली जाणारी मासळी फॉर्मेलिनमुक्त असल्याचे पुरावे आमच्याकडे आहेत.
गिरीश चोडणकरांना हौस आहे तर त्यांनी केव्हाही माझ्यासोबत मासळी बाजारात चलावे. मी सोबत तपासणी अधिकारी घेतो आणि माध्यमांसमोर चोडणकर म्हणतील त्या माशांमधील फॉर्मेर्लिनची मात्रा तपासायला मी तयार असल्याचे आव्हान गोव्याचे अन्न आणि औषध प्रशासन मंत्री विश्वजित राणे यांनी गोवा कॉंग्रेसचे अध्यक्ष गिरीश चोडणकर यांना दिले असे मंत्री राणे यांनी आव्हान दिले आहे.
सध्या कॉंग्रेसकडे विरोधी पक्ष म्हणून विषयच नसल्याने कोणत्याही विषयाचा तो बाऊ करीत आहेत. कॉंग्रेसला गोव्यात सरकार स्थापन करण्याची इच्छा तर आहे, मात्र विरोधी पक्ष म्हणून विषय नसल्याने त्यांच्याकडून अर्थहीन विषयांना सतत फोडणी दिली जाते. अनेक गरीब आणि गरजू गोमन्तकीय जनतेचे पोट मासळी विक्रीवर अवलंबून आहे. कॉंग्रेसकडून केल्या जाणाऱ्या दिशाभूल वक्तव्यांमुळे लोक मासळी घेण्यास पुढे येत नाहीत, आणि त्यामुळे सर्वसामान्य जनता भरडली जात असल्याचेही मंत्री राणे म्हणाले.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.