राष्ट्रपतींच्या हस्ते पद्म पुरस्कारांचे वितरण

padma-awards
padma-awards

नवी दिल्ली - राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते राष्ट्रपती भवनात आयोजित केलेल्या कार्यक्रमात आज पद्म पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. यावर्षी पद्म पुरस्कारांसाठी 112 जणांची निवड करण्यात आली होती. यामध्ये 56 जणांना आज हे पुरस्कार देण्यात आले. तर उर्वरीत पद्म पुरस्कार मिळालेल्या सन्मानितांना16 मार्च रोजी पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. 

आज प्रदान करण्यात आलेल्या पुरस्कारांमध्ये माजी परराष्ट्र सचिव एस. जयशंकर, प्रभुदेवा, रेस्लर बजरंग पूनिया यांचा समावेश होता. दाक्षिणात्य सुपरस्टार मोहनलाल यांना पद्म भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तर नृत्य आणि कला क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदानासाठी प्रभुदेवा यांना पद्मश्री पुरस्कार देण्यात आला. 

तसेच, भारतीय तबलावादक आनंद शिवमणी यांना पद्मश्री, कबड्डी जीम कप्तान अजय ठाकूर यांना पद्मश्री तर प्रत्रकार कुलदीप नेय्यर यांना मरणोत्तर पद्म भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. 

महाराष्ट्रातील अनिलकुमार माणिभाई नाईक यांची व्यापार आणि उद्योग क्षेत्रातील कामगिरीसाठी, बळवंत मोरेश्वर पुरंदरे यांची अभिनय क्षेत्रातील कामगिरीसाठी, अशोक कुकाडे यांची औषध क्षेत्रासाठी, मनोज वाचपेयी काला क्षेत्र, दिनयार कॉन्ट्रॅक्टर कला क्षेत्र, सुदामा कोटे औषध क्षेत्र, वामन केंद्रे कला क्षेत्र, रविंद्र कोल्हे आणि स्मिता कोल्हे स्वस्त दरात उपचार करण्यासाठी, नागिनदार संघवी साहित्य क्षेत्र, शब्बीर शय्यद सामाजिक कार्यासाठी पुरस्कारांसाठी निवड करण्यात आली आहे. 

हा देशातील खूप मोठा सन्मान असून, व्यक्ती म्हणून आणि कलाकार म्हणून हा पुरस्कार माझ्यासाठी खूप महत्त्वाचा असल्याचे अभिनेता मोहनलाल यांनी सांगितले. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com