कशेडी घाटात रसायनाचा टँकर पलटी

truck
truck

रत्नागिरी : मुंबई - गोवा महामार्गावरील कशेडी घाटातील अवघड वळणावर रसायनाचा टँकर पलटी झाला आहे. या अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक पाच तास ठप्प झाली. ही घटना आज सकाळी साडेनऊच्या सुमारास घडली.

कशेडी घाटातील पोलादपूर हद्दीतील धामणदेवी गावाच्या नजीक हा अपघात झाला. टँकर मधील ज्वालाग्रही रसायन रस्त्यावर पसरल्यामुळे दोन्ही बाजूची वाहतूक थांबवण्यात आली आहे.

घटनास्थळावर अग्निशमन दलाचे बंब मागविण्यात आले आहेत. तर क्रेनच्या सहाय्याने कंटेनर बाजूला करण्याचे काम सुरु आहे. अशी माहिती घटनास्थळावरून प्राप्त झाली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com