अपंग आणि अनाथ प्राण्यांना मिळाली मायेची कूस

pali.
pali.

पाली - मोकाट आणि उनाड प्राण्यांच्या लेखी नेहमीच उपेक्षा आणि अवहेलना वाट्याला येते. त्यात अनाथ व अपंग प्राण्यांची परिस्थिती तर दयनीयच असते. या अपंग अनाथ प्राण्यांना हक्काची जागा आणि शुश्रूषा मिळावी यासाठी डॉ. अर्चना आणि गणराज जैन यांनी भारतातील पहिला अपंग व अनाथ प्राण्यांचा निशुल्क अनाथाश्रम सुरू केला आहे. बदलापूर जवळील चामटोली येथे “पाणवठा” हा अनाथाश्रम उत्तम दर्जाची सेवा देत आहे.

ज्या प्राण्यांना बाहेरच्या समाजात जगणे अवघड असते अशा परिस्थीतीत असणार्‍या प्राण्यांना देखील येथे दाखल केले जाते. जैन दाम्पत्य मूळचे रायगड जिल्ह्यातील महाड येथील आहेत.

मागील दहा वर्षांपासून ते जखमी आणि अनाथ प्राण्यांवर उपचार करत आहेत. महाड येथे बेवारस जखमी प्राण्यांची मोफत उपचार व देखभाल करणारे सफर केंद्र ते चालवत होते. आत्तापर्यंत त्यांनी जवळपास 5000 जखमी प्राण्यांवर मोफत उपचार केले आहेत. 

कायमस्वरुपी अपंग होणार्‍या प्राण्यांकरीता हक्काचं मोफत निवारा केंद्र नसल्याचं नेहमीच जाणवत होतं. जखमी प्राण्यांकरीता कार्यरत असलेल्या अनेक व्यक्ती व संस्थाना देखील कोणताच प्राणी कायमस्वरुपी ठेवणे अशक्य असते. त्यामुळेच या प्राण्यांना हक्काची जागा देण्याचे ठरविले, आणि पाणवठा साकारला. लोकांनी अशा उपक्रमांना आपले मानून कार्यरत होणे गरजेचे आहे. खास करून तरुणांनी मदतीसाठी पुढे येणे आवश्यक आहे.
डॉ. अर्चना आणि गणराज जैन

1) भारतातील पहिला अपंग प्राण्यांचा अनाथाश्रम.
2) भारतात प्रथमच सोल टू सोल म्यूजीक थेरपीचा प्राण्यांसाठी वापर.
3) माणसांच्या आश्रमाप्रमाणेच प्रत्येक प्राण्याची वेगळी राहण्याची खोली व साहीत्य.
4) प्रत्येकाची मोफत वैदकीय तपासणी.

अपंग झालेल्या प्राण्यांचे दिनक्रम वेगळे असते. त्यांना सांभाळणे अतिशय कठीण व आव्हानात्मक काम आहे. त्याकरीता लागणारं साहित्यही वेगळे असते. त्यामुळे जरी हा उपक्रम अनोखा असला तरी त्याला राबवतांना नवनवीन कल्पना राबवाव्या लागत आहेत. असे गणराज जैन यांनी सकाळला सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com