Ratnagiri Sindhudurg Loksabha 2019 : चार वाजेपर्यंत 38.36  टक्के मतदान

Ratnagiri Sindhudurg Loksabha 2019 : चार वाजेपर्यंत 38.36  टक्के मतदान

रत्नागिरी - दुपारी चार वाजेपर्यंत रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघात 38.36  टक्के मतदान झाले होते. मतदार संघात 1942 मतदान केंद्रावर आज मतदान होत आहे. मतदार संघात एकूण सहा विधानसभा मतदारसंघा आहेत. यापैकी रत्नागिरी 39.02 टक्के, चिपळूण 36.73 टक्के, राजापूर 39.19 टक्के, कणकवली 36.52 टक्के, कुडाळ 39.08 टक्के आणि सावंतवाडी 39.79 टक्के एवढे मतदान या विधानसभा मतदारसंघात झाले आहे.

सेल्फीचे आकर्षण कुणाला नसते. लोकशाहीच्या महोत्सवात सुद्धा तरुण मतदार मतदानाकडे आकर्षित व्हावा. यासाठी निवडणुक विभागानं रत्नागिरीत चक्क सेल्फी पाँईट उभारला आहे. रत्नागिरी शहरातल्या दामले विद्यालयात मतदान केल्यानंतर तुम्हाला तुमचा सेल्फी काढण्यासाठी सेल्फी झोन उभारला आहे. या सेल्फी झोनमध्ये फोटो घेवून अनेकांनी आपलं पहिलं केलेलं मतदान हे आपल्या मोबाईलच्या कॅमेऱ्यात कैद केलंय.

मतदारांमध्ये कमालीचा उत्साह पाहायला मिळत आहे. त्याचबरोबर नविन मतदार देखील मोठ्या उत्साहात मतदान केंद्रावर येताना पहायला मिळत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com