'मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण देणार; ओबीसींना धक्का नाही'

'मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण देणार; ओबीसींना धक्का नाही'

मुंबई : मराठा समाज सामाजिक आणि आर्थिक मागास असलेला घटक आहे. त्यामुळे हा समाज आरक्षणासाठी पात्र आहे, अशी शिफारस अहवालात करण्यात आली आहे. या अहवालानुसार, मराठा समाजाला 'सोशिअली इकोनॉमिक बॅकवर्ड क्लास' (एसईबीसी) हा नवा प्रवर्ग तयार करून त्याअंतर्गत आरक्षण देण्यात येणार आहे, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज (रविवार) केली.

हिवाळी अधिवेशाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषद घेऊन ही घोषणा केली. 

मुख्यमंत्र्यांच्या पत्रकार परिषदेतील ठळक मुद्दे : 

- मराठा समाज सामाजिक आणि आर्थिक मागास

- मागासवर्गीय आयोगाने तीन शिफारसी केल्या आहेत.

- मराठा समाज आरक्षणासाठी पात्र, अशी अहवालात शिफारस

- मराठा समाजाला स्वतंत्र कोट्यातूनच आरक्षण 

- यासाठी एसई-बीसी हा नवा प्रवर्ग तयार करून या प्रवर्गात मराठा समाजाला आरक्षण देण्यात येणार आहे.

- यासाठी उपसमिती स्थापन करण्यात आलेली आहे.

- मंत्रिमंडळाने या शिफारसी स्वीकारल्या असून, एसईबीसीतून मराठा आरक्षण

- केंद्रीय मागावसवर्गीय आयोगाची आता परवानगीची आवश्यकता नाही.

- विरोधकांनी राजकारण करू नये. आवश्यक सूचना द्याव्यात

- राज्याच्या हिताचे प्रश्न विरोधकांनी उपस्थित करावेत.

धनगर आरक्षणाबाबतही आमच्याकडे अहवाल प्राप्त

- धनगर समाजाला 3.5 टक्के वेगळे आरक्षण द्यावे लागेल, यासाठी आवश्यक ती कार्यवाही करण्यात येईल.

- धनगर आरक्षणाबाबतही आमच्याकडे अहवाल प्राप्त

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com