गोवंश कायद्याची पायमल्ली, पंधरा हजाराचे गोमांस जप्त 

cow
cow

नांदेड : गोवंश हत्या बंदी कायदा लागू असतांना नांदेड ग्रामिण पोलिसांनी कारवाई करत कायद्याची पायमल्ली करणाऱ्या एकाला अटक केली. त्याच्याकडून पंधरा हजाराचे अंदाजे एक क्विंटल गोमांस व साहित्य जप्त केले. ही कारवाई हिलालनगर भागात रविवारी (ता. 5) सायंकाळी सहाच्या सुमारास केली. 

नांदेड ग्रामिण पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक पंडीत कच्छवे यांच्या मार्गदर्शनाखाली एक पथक रविवारी (ता. 5) सायंकाळी आपल्या हद्दीत गस्त घालीत होते. यावेळी पथकाला त्यांनी देगलूर नाका परिसरात असलेल्या हिलालनगर भागात गोवंशाची कत्तल होत असल्याची महिती मिळाली. या पथकांनी त्या ठिकाणी कारवाई केली असता मोहमद मुस्तफा अब्दुल रशीद (वय 32) हा आपल्या घरी गोवंशाची कत्तल करून त्याचे मांस विक्री करीत होता. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. तसेच घटनास्थळावरून सुरी, कुऱ्हाड असे साहित्य जप्त केले. महापालिकेच्या पशुसंवर्धन अधिकाऱ्यांना बोलावून घेऊन पंचनामा केला.

जप्त केलेले गोमांस निर्मणुष्य ठिकाणी गाडून टाकून नष्ट केले. फौजदार शेख जावेद यांच्या फिर्यादीवरुन नांदेड ग्रामिण पोलिस ठाण्यात आरोपी मोहमद मुस्तफाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलिस हवालदार सय्यद महेमुद हे करीत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com