नांदेड : चोरी करणाऱ्या महिलांची टोळी जेरबंद  

jail
jail

नांदेड : रेल्वेत प्रवाशांच्या नजरा चुकवून त्यांच्या किंमती साामानाची चोरी करणारी महिलांची टोळी लोहमार्ग पोलिसांनी पूर्णा परिसरातून 14 सप्टेंबरला अटक केली. त्यांच्याकडून चोरलेला मुद्देमाल जप्त करून न्यायालयासमोर हजर केले असता त्यांना न्यायालयीन कोठडीत पाठविले आहे. 

औरंगाबाद लोहमार्गचे पोलिस अधिक्षक चंद्रकिशोर मीना यांनी या विभागाचा पदभार स्विकारताच त्यांटा दरारा या भागातील अनेकक गुन्हेगारांना माहिती असल्याने भितीने अनेक गुन्हेगांरानी रेल्वेची हद्द सोडून पळ काढला. परंतु बेसावध असलेल्या महिला चोरांनी प्रवाशांचे किंमती सामान लक्ष केले. परळी ते अकोला जाणाऱ्या पॅसेंजर गाडीने औंढा तालुक्यातील लाख येथील प्रविण लोंढे हे आपल्या परिवारासह परभणी ते धामणी असा 12 सप्टेंबरला प्रवास करीत होते.

यावेळी सर्वसाधारण डब्यात त्यांच्या मागे- पुढे गर्दी करत पूर्णा येथील महिलां चोरांनी त्यांच्या खिशातील पर्स काढून घेतले. त्यात काही रक्कम व महत्वाचे ओळखपत्र होते. पर्स गेल्याचे त्यांच्या लक्षात येताच त्यांनी पूर्णा लोहमार्ग पोलिसांसी संपर्क साधला. त्यानंतर नांदेड लोहमार्ग ठाण्यात गुन्हा दाखल होताच पोलिस निरीक्षक अशोक जाधव यांनी आपल्या सहकाऱ्यांसह पूर्णा व घटनास्थळ परिसर गाठला. प्रविण लोंढे यांच्या सांगण्यावरून त्यांनी पूर्णा तालुक्यातील कमलापूर भागात राहणाऱ्या सहा महिलांना ताब्यात घेतले. त्यांची अधिकची चौकशी केली असता त्यांनी चोरलेली पर्स व रक्कम पोलिसांना काढून दिली.

अंजली भोसले, राधिका भोसले, प्रिती शिंदे, राधा शिंदे, सोनु भोसले आणि अमीन भोसले या सहा महिलांविरूद्ध जबरी चोरीचा गुन्हा दाखल करून त्यांना औरंगाबाद रेल्वे न्यायालयासमोर हजर केले. यावेळी न्यायालयांनी त्यांना न्यायालयीन कोठडीत पाठविले आहे. तसेच परभणी न्यायालयात २९ सप्टेंबर रोजी हजर राहण्याचे आदेश दिले असल्याचे निरीक्षक श्री. जाधव यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com