छावणी उपाध्यक्षपदी पद्मश्री जैस्वाल बिनविरोध

jaiswal
jaiswal

औरंगाबाद : छावणी परिषदेच्या उपाध्यक्षपदी शिवसेनेच्या पद्मश्री अनील जैस्वाल यांची बिनविरोध निवड करण्यात आली. 

छावणी परिषदेच्या उपाध्यक्षपदाचा प्रशांत तारगे यांनी राजीनामा दिला होता. तारगे यांच्या राजिनाम्याने रिक्त झालेल्या उपाध्यक्ष पदासाठी आज गुरुवारी (ता. 15) निवडीसाठी छावणीचे अध्यक्ष ब्रिगेडिअर डी. के. पाञा यांच्या अध्यक्षतेखाली बैठक बोलविण्यात आली होती. उपाध्यक्षपदासाठी नगरसेविका पद्मश्री जैस्वाल यांचे नामनिर्देशन पत्र होते. त्यावर बैठकिच्या सुरवातीस नगरसेवक संजय गारोल व शेख हनिफ यांनी सुचक अनुमोदन दिले. त्यानंतर ब्रिगेडिअर डी. के. पात्रा यांनी पद्मश्री जैस्वाल यांच्या नावाची घोषणा केली. जैस्वाल यांच्या नावाची घोषणा करतांच फटाके वाजवून जल्लोष करण्यात आला.

यावेळी आमदार संजय शिरसाट, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अंबादास दानवे, शहरप्रमुख विजय वाघचौरे, सभागृहनेता विकास जैन, उपशहरप्रमुख राजू राठोड, अनिल मकरिये, करणसिंग काकस यांची उपस्थित होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com