परभणीत स्थानिक गुन्हे शाखेचे 'ऑल आऊट ऑपरेशन'

Local Crime Branchs All Out Operation In Parbhani
Local Crime Branchs All Out Operation In Parbhani

परभणी : विविध गुन्हे असलेल्या परभणीतील एका हद्दपार एका कुख्यात आरोपीजवळ गावठी पिस्टलसह जिवंत काडतूसे व धारदार शस्त्र सापडली आहेत. स्थानिक गुन्हे शाखेच्यावतीने सोमवारी (ता. 17) पहाटे नेहरू नगरमध्ये ऑल आऊट ऑपरेशनच्या माध्यमातून ही कारवाई करण्यात आली.

परभणीचे पोलिस अधिक्षक कृष्णकांत उपाध्याय व अपर पोलिस अधिक्षक विश्व पानसरे यांच्या मार्गदर्शनाखाली रविवार (ता. 16) पासून जिल्ह्यात ऑल आऊट ऑपरेशन सुरु करण्यात आले आहे. या ऑपरेशन दरम्यान, जिल्ह्यातून हद्दपार केलेला आरोपी बिबनसिंग बावरी हा परभणीतील त्याच्या घरी आला असून त्याच्याजवळ पिस्टल व तलवार आहे, अशी असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक प्रवीण मोरे यांना मिळाली होती. या माहितीवरून सोमवारी पहाटे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने नेहरू नगर मधील त्याच्या घरी छापा मारला असता तो घरात आढळून आला. त्याला अटक करून घराची झडती घेतली असता घरातील पलंगाच्या गादीखाली गावठी पिस्तूल, दोन जिवंत काडतूसे व धारदार शस्त्र पोलिसांना सापडेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com