दहा लाखाच्या अमली पदार्थासह तरुण अटकेत 

दहा लाखाच्या अमली पदार्थासह तरुण अटकेत 

अंधेरी : दहा लाखाचा एमडी हा अमली पदार्थ विकण्यासाठी आणलेल्या 26 वर्षीय तरुणाला डी एन नगर पोलीस ठाण्याच्या विशेष पथकाने बेड्या ठोकल्या. त्याच्याकडून 250 ग्राम एमडी आणि 360 रुपये असा मुद्देमालाही हस्तगत केला. 

फैजुद्दीन उर्फ रेहान मोहम्मद नासीरउद्दीन काझी (26) हा अंधेरीला राहणारा तरुण, एमडी या अंमली पदार्थाच्या विक्रीसाठी तेथील गिल्बर्ट हिल रोड परिसरात येणार असल्याची माहिती पोलीस पथकाला मिळाली होती. त्यामुळे डी. एन. नगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक परमेश्वर गणमे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस पथकाने तेथे सापळा रचला. संध्याकाळच्या वेळेस तेथे आलेल्या फैजुद्दीनच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने पोलिसांनी त्याला चौकशीसाठी ताब्यात घेतले.

झडतीती त्याच्याकडे एमडी नावाचा अडीचशे ग्राम अमली पदार्थ असल्याचे आढळले. बाजारात 250 ग्राम एमडीची किंमत दहा लाख असल्याचे समोर आले. त्याच्या विरोधात डी एन नगर पोलीस ठाण्यात अंमली पदार्थ विरोधी कायद्यानुसार गुन्हा दाखल केला. पोलिसांनी त्याला न्यायालयात नेले असता त्याला 15 जुलै पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले. फैजुउद्दीन याने अमली पदार्थ कुणाकडून आणि कुणासाठी आणला याबाबत सखोल चौकशी करीत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com