दहा लाखांच्या अमली पदार्थासह तरुण अटकेत

दहा लाखांच्या अमली पदार्थासह तरुण अटकेत

अंधेरी - दहा लाखांचा एमडी हा अमली पदार्थ विकण्यासाठी आलेल्या २६ वर्षांच्या तरुणाला डी. एन. नगर पोलिस ठाण्याच्या विशेष पथकाने बेड्या ठोकल्या. पोलिसांनी त्याच्याकडून २५० ग्रॅम एमडी आणि ३६० रुपये असा मुद्देमाल हस्तगत केला. 

फैजुद्दीन ऊर्फ रेहान मोहम्मद नासीरउद्दीन काझी (२६) हा अंधेरीला राहणारा तरुण एमडी या अमली पदार्थाच्या विक्रीसाठी गिल्बर्ट हिल रोड परिसरात येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यामुळे डी.एन. नगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक परमेश्‍वर गणमे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने तेथे सापळा रचला. तेथे आलेल्या फैजुद्दीनच्या हालचाली संशयास्पद वाटल्यामुळे पोलिसांनी त्याला चौकशीसाठी ताब्यात घेतले. 

झडतीत फैजुद्दीनकडे २५० ग्रॅम एमडी असल्याचे आढळले. बाजारात २५० ग्रॅम एमडीची किंमत १० लाख रुपये आहे. पोलिसांनी त्याच्याविरोधात डीएन नगर पोलिस ठाण्यात अमली पदार्थविरोधी कायद्यानुसार गुन्हा दाखल केला. पोलिसांनी न्यायालयात नेले असता, त्याला १५ जुलैपर्यंत पोलिस कोठडीत सुनावण्यात आली. त्याने अमली पदार्थ कुणाकडून आणि कुणासाठी आणला, याबाबत पोलिस चौकशी करत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com