पोलिस अधिकाऱ्यांच्या गावात आणखी दोन पोलिस उपनिरीक्षक

uplai
uplai

उपळाई बुद्रूक (सोलापूर) : राज्य लोकसेवा आयोगाच्या वतीने २०१६ साली घेण्यात आलेल्या खात्याअंतर्गत पोलिस उपनिरीक्षक परिक्षेत अधिकाऱ्यांचे गाव म्हणुन प्रसिद्ध असलेल्या उपळाई बुद्रूक येथील दोन सुपूत्रांनी घवघवीत यश संपादन केले आहे. वसंत चंद्रकांत शिंदे व दिपक बजरंग शिंदे  दोघेही उपळाई बुद्रूक येथील रहिवासी असुन घरची परिस्थिती अत्यंत बिकट असताना देखील दोघांनी परिस्थितीवर मात करत शिक्षण पूर्ण केले.

दोघांचेही प्राथमिक शिक्षण उपळाई बुद्रूकच्या जिल्हा परिषद शाळेत तर माध्यमिक शिक्षण नंदिकेश्वर विद्यालयात झाले आहे. तर पदवीचे माढा येथील कला व वाणिज्य महाविद्यालयात झाले आहे. दिपक शिंदे व वसंत शिंदे या दोघांचेही पदवीचे शिक्षण पुर्ण होताच मुबंईत पोलिस भरती झाले होते. परंतु एवढ्यावरच न थांबता गावातील इतर अधिकार्यांप्रमाणे आपणही मोठ्या पदावर विराजमान व्हायचे स्वप्न बाळगुन ते स्पर्धा परिक्षेचा अभ्यास करत होते. नुकतेच शासनाने २०१६ मधिल खात्याअंतर्गत पोलिस उपनिरीक्षक मधिल यशस्वी उमेदवारांची यादी प्रसिद्ध केली आहे. त्यात उपळाईच्या या दोघांनी यश मिळवल्याबद्दल सर्वच स्तरातुन या दोघांवर अभिनंदनाचा वर्षांव होत आहे. त्यांच्या या यशाबद्दल सेलमच्या जिल्हाधिकारी रोहिणी भाजीभाकरे-बिदरी, श्रीगंगानगरचे जिल्हाधिकारी शिवप्रसाद नकाते, मुबंईचे पोलिस उपायुक्त डाॅ संदिप भाजीभाकरे, पुण्याचे आयकर उपायुक्त स्वप्निल पाटील, औरंगाबादचे सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी श्रीकृष्णा नकाते, सांगलीचे समाजकल्याण अधिकारी सचिन कवले व कराडचे तहसीलदार अमरदिप वाकडे यांनी अभिनंदन केले. 

पोलिस उपनिरीक्षक पदासाठी खुप प्रयत्न करत होतो परंतु यश मिळत नसल्याने खात्याअंतर्गतुन यश मिळवायचा निश्चय केला. अंखड परिश्रमाला आज यश मिळाले. 
- दिपक शिंदे, नुतन पोलिस उपनिरीक्षक 

हे यश माझ्या एकट्याचे नसुन सर्व कुटूंब व मित्रपरिवराचे आहे. गावातील इतर अधिकार्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून त्या दिक्षेने वाटचाल करत यश संपादन केले. 
- वसंत शिंदे, नुतन पोलिस उपनिरीक्षक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com