राष्ट्रवादीचे माजी खासदार लक्ष्मणराव पाटील यांचे निधन 

Laxman Patil
Laxman Patil

सातारा :  राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते, माजी खासदार आणि जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष लक्ष्मणराव पाटील (वय 81) यांचे आज सकाळी मुंबईतील जसलोक रुग्णालयामध्ये निधन झाले. 

गेल्या काही वर्षांपासून माजी खासदार लक्ष्मणराव पाटील हे पार्किन्सन आजाराने त्रस्त होते. महिनाभरापूर्वी पहाटेच्या सुमारास त्यांना अचानक रक्तस्त्राव झाला. त्यामुळे त्यांची प्रकृती चिंताजनक झाली होती. त्यामुळे त्यांना साताऱ्यातील  प्रतिभा हॉस्पिटलमध्ये उपचारार्थ दाखल करण्यात आले होते.  त्यांची प्रकृती स्थिर राहिल्याने अधिक उपचारासाठी त्यांना मुंबईतील जसलोक हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते.

दरम्यान, उपचार सुरू असताना आज सकाळी त्यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी सुमन पाटील, मुलगा मिलिंद, नितीन, आमदार मकरंद पाटील, सुना, नातवंडे असा परिवार आहे. आज दुपारी त्यांचे पार्थिव मुंबईतून साताऱ्यात आणण्यात येणार असून त्यानंतर विकासनगर येथील त्यांच्या घरी थोडावेळ ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर ते जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत दर्शनासाठी ठेवल्यानंतर बोपेगाव या त्यांच्या मुळगावी नेण्यात येणार आहे, अशी माहिती त्यांच्या निकटवर्तीयांनी दिली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com