पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीच्या निषेधार्थ जागरण गोंधळ

mohol
mohol

मोहोळ (सोलापूर) : सततच्या वाढत्या पेट्रोल व डिझेलच्या दरवाढीविरोधात हैराण झालेल्या जनतेच्या वतीने मोहोळ शहर राष्ट्रवादी काँग्रेसने तहसीलकार्यासमोरच जागरण गोंधळाची पूजा मांडून त्यावर मुख्यमंत्री देंवेंद्र फडणीस व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रतिमा ठेऊन सरकारचेच जागरण गोंधळ घातले.

देशासह राज्यात दैनंदिन पेट्रोल व डिझेलच्या वाढत्या किंमतीने सर्वसामान्य माणूस हैराण होत आहे. त्यासाठी सरकार कोणताही सकारात्मक निर्णय घेताना दिसत नाही. याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सरकारचाच जागरण गोंधळ घालण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार जागरण गोंधळाची मंडपात परंपरेप्रमाणे पूजा मांडण्यात आली. नंदा पाटोळे व त्यांच्या सहकाऱ्यांची मुरळ्यासह जागरण गोंधळ पार्टी बोलाविण्यात आली. यावेळी दिवटी पेटवुन त्यावर नगराध्यक्ष रमेश बारसकर तेल घालत बसले. या जागरण गोंधळात नंदा पाटोळे यांनी अतिशय विनोदी पद्धतीने इंधन दरवाढीविरोधात गिते व सवाल जबाबातुन व संवादातून  सरकारचे वाभाडे काढले. 

यावेळी जागरण गोंधळाच्या मंडपात नगराध्यक्ष रमेश बारसकर यांच्यासह आयोजक राष्ट्रवादीने शहर कार्याध्यक्ष नागेश चंद्रकांत बिराजदार, तालुकाध्यक्ष प्रकाश चवरे, उपाध्यक्ष हेमंत गरड, कृषी उत्पन्न बाजारासमितीचे सभापती नागेश साठे, सोलापुर जिल्हा निरीक्षिका निर्मला बावीकर, शहर अध्यक्ष दाजी गाढवे, युवक शहराध्यक्ष एजाज तलफदार, महिला शहर अध्यक्षा यशोदा कांबळे, पंचायत समिती सदस्या सिंधुताई वाघमारे, कामिनी चोरमले, नंदा बनसोडे, सुनीता धोत्रे, वर्षा दुपारगुडे, संतोष वायचळ, संतोष सुरवसे, आण्णा फडतरे, सुरेश कांबळे, रुपेश धोत्रे यांच्यासह बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com