कृत्रिम टंचाईमुळे साबुदाणा महाग

Sabudana
Sabudana

पुणे - साबुदाण्याची कृत्रिम टंचाई निर्माण झाल्याने भावात वाढ झाली आहे. गेल्या दीड महिन्यात साबुदाण्याचे भाव प्रति किलो वीस ते तीस रुपयांनी वाढले आहेत. यामुळे सर्वसामान्यांबरोबरच व्यापारीही अडचणीत आले आहेत. दर कमी झाले नाही, तर आम्ही साबुदाण्याची विक्रीच करणार नाही, अशा इशारा साबुदाणा व्यापारी संघटनेचे दिला आहे.

दीड महिन्यापूर्वी ५० ते ५५ रुपये प्रतिकिलो असलेले साबुदाण्याचे भाव आता तब्बल ९० ते १०० रुपयांपर्यंत पोचले आहेत. तमिळनाडूतील स्थानिक राजकारणाचा परिणाम या भाववाढीवर होत आहे. या भाववाढीचा फायदा थेट शेतकऱ्यांनादेखील होत नसून कृत्रिम टंचाई निर्माण करून काही साठेबाज सगळा फायदा खिशात घालत असल्याची तक्रार संघटनेचे अध्यक्ष अशोक लोढा यांनी केला. ते म्हणाले, की साबुदाणाच्या भावातील सततच्या चढउताराची झळ ग्राहकांसह व्यापाऱ्यांनाही बसत आहे. साबुदाण्याचे उत्पादन यंदा चांगले आहे.

शिवाय मागील वर्षीचा साठाही शिल्लक आहे. परंतु काही साठेबाजांनी जुन्या भावात साबुदाणा खरेदी करून ठेवली आहे. ते कृत्रिम टंचाई निर्माण करीत आहेत. अन्यथा मे महिनात साबुदाण्याच्या भाववाढीचे काहीच कारणही नाही. हे भाव सध्या प्रतिकिलो ४० ते ५० रुपये हवेत, त्यासाठी ग्राहकांना सुमारे ९० रुपये मोजावे लागत आहे.’

साबुदाण्याच्या भावातील चढउतार 
(व्यापारी खरेदी दर प्रति ९० किलो)
तारीख                     रुपये

८ डिसेंबर २०१८        ३,१९९
१३ डिसेंबर २०१८      ३,३२०
१८ जानेवारी २०१९   ४,११०
१ एप्रिल २०१९         ५,१०५
१ मे २०१९              ६,१०५
७ मे २०१९              ६,४३५
१६ मे २०१९            ५,६३०
२८ मे २०१९             ६,२७५

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com