होंडा सिटी कारचा अपघातात दोघांचा मृत्यु; पाच जखमी

00accident_86_29.jpg
00accident_86_29.jpg

पुणे : खराडी येथे काल रात्री होंडा सिटी कारचा अपघात झाला. त्यामध्ये एका ज्येष्ठ महिलेसह 11 वर्षाच्या नातवाचा मृत्यु झाला. तर पाच जण जखमी आहेत. चालकाचे नियंत्रण सुटल्याने होंडासिटी कारने पाच जणांना उडविले. शांताबाई साहेबराव सोनवणे (वय  61), नयन रमेश मोकळे (वय 11, रा.सातववस्ती, खराडी) असे मृतांची नावे आहेत.

बुधवारी रात्री साडे आठ वाजता रेडीसन हॉटेलजवळील अंतर्गत रस्त्यावर हा अपघात झाला. सातव्या दिवशी गणपती विसर्जन मिरवणुक सुरु असताना हा अपघात झाला. होंडा सिटी कार रेडीसन हॉटेलकडुन खराडीच्या दिशेने येत होती. त्यावेळी सोनवणे व त्यांचा नातु रस्त्याच्या कडेला थांबले होते. चालकाचे नियंत्रण सुटल्याने कारने 4 गाड्याना उडविले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com