हॉकर्स झोन निश्‍चित

भोसरी - आळंदी रस्त्यालगत विक्रेत्यांनी रस्त्यावर व पदपथावर थाटलेल्या दुकानांमुळे झालेली वाहतूक कोंडी.
भोसरी - आळंदी रस्त्यालगत विक्रेत्यांनी रस्त्यावर व पदपथावर थाटलेल्या दुकानांमुळे झालेली वाहतूक कोंडी.

पिंपरी - महापालिकेच्या ‘ई’ क्षेत्रीय कार्यालयांतर्गत येणाऱ्या भोसरी, मोशी, चऱ्होली व दिघीतील मुख्य रस्त्यांवर फेरीवाले, पथारी, हातगाडी, टपरीधारकांनी ठाण मांडल्यामुळे रहदारीस अडथळा होत आहे. त्यातून मार्ग काढण्यासाठी या चारही भागांतील फेरीवाले, पथारीवाल्यांचे सर्वेक्षण करून हॉकर्स झोनसाठी जागा निश्‍चित केल्या आहेत. त्याला शहर फेरीवाला समितीची मान्यता मिळाल्यानंतर कार्यवाही केली जाणार आहे. त्यामुळे परिसरातील वाहतूक कोंडी व हॉकर्स झोनचा प्रश्‍न सुटणार आहे.

भोसरी व मोशीतील पुणे-मुंबई महामार्ग व सेवा रस्ते, भोसरी-आळंदी रस्ता, भोसरीतील गवळीनगर परिसर, दिघी रस्ता, मोशी-आळंदी रस्ता, चऱ्होलीगाव ते चऱ्होली फाटा, चऱ्होलीगाव ते काळजेवाडी रस्ता, दिघीतील पुणे-आळंदी रस्ता व बोपखेलगावातील मुख्य रस्ता आदी भागांत टपरी, पथारी, हातगाडी व फिरते विक्रेते यांनी रस्त्यावरच दुकाने थाटली आहेत. त्यामुळे रहदारीस अडथळा होत आहे. 

त्यातून मार्ग काढण्यासाठी आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी फेरीवाला उपसमिती व फेरीवाला झोन (हॉकर्स) निश्‍चित करण्याबाबत ‘ई’ क्षेत्रीय कार्यालयांतर्गत झालेल्या बैठकीत सूचना केली होती. त्यानुसार ‘ई’ क्षेत्रीय कार्यालयाने कार्यक्षेत्रातील प्रभाग तीन चऱ्होली-मोशी, प्रभाग चार दिघी-बोपखेल, प्रभाग पाच भोसरी-गवळीनगर आणि प्रभाग सात भोसरी गावठाण भागातील फेरीवाले, टपरी, पथारीवाल्यांचे सर्वेक्षण करून हॉकर्स झोन व नो हॉकर्स झोन क्षेत्र निश्‍चित केले आहे.

दृष्टिक्षेपात सर्वेक्षण 
१०४९ एकूण विक्रेते     
८८६ पात्र      
१६३ अपात्र      
६०७ बायोमेट्रिक पूर्ण      
५१८ ओळखपत्र धारक      
६८६ स्थिर हॉकर्स      
२०० अस्थिर हॉकर्स      

फेरीवाला क्षेत्र 
मोशी चौकातील मंडई जवळच्या जागेत प्रस्तावित ५० हॉकर्स, चऱ्होलीगाव चौक ते चऱ्होली फाटा दरम्यान १०, चऱ्होली चौक ते काळजेवाडी रस्ता डाव्या बाजूस १० व उजव्या बाजूस २२, दिघी-बोपखेल येथील पवळी रस्ता ४९, सावंतनगर २५, कृष्णानगर रस्त्यावर २०, पवळी रस्ता २०, लांडगे नाट्यगृह ते सेक्‍टर एकमधील नाल्यापर्यंत उजव्या व डाव्या बाजूस प्रत्येकी १२०, असे २४० हॉकर्स निश्‍चित केले आहेत. गवळीनगरमध्ये फिरता फेरीवाला क्षेत्र असेल. 

एक बाय एक मीटर लांबी-रुंदी असलेल्या जागा निश्‍चित केल्या आहेत. मात्र, उपसमितीला काही जागा अमान्य आहेत. हा विषय शहर फेरीवाला समितीच्या मान्यतेसाठी ठेवला आहे. मान्यता मिळाल्यानंतर पुढील कार्यवाही केली जाईल. 
- श्रीनिवास दांगट, ‘ई’ क्षेत्रीय अधिकारी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com