पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालय बंद करा!

पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालय बंद करा!

पिंपरीः शहरात अडीच वर्षाच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार करून तिचा निर्घूण खून केल्याचा गंभीर गुन्हा घडताच पिंपरी-चिंचवड शहर जिल्हा राष्ट्रवादी आक्रमक झाली आहे. पोलिस आयुक्तालय स्थापूनही शहरातील गुन्हेगारी वाढतच चालल्याने आयुक्तालयच बंद करावे, अशी मागणी पक्षाने आज केली.

जेमतेम अकरा महिन्यापूर्वी म्हणजे गेल्यावर्षी 15 ऑगस्टला पुणे पोलिस आयुक्तालयाचे विभाजन करून पिंपरी-चिंचवडसाठी स्वतंत्र आयुक्तालय सुरु करण्यात आले आहे. मात्र, त्यानंतरही शहरातील गुन्हेगारी कमी होण्याऐवजी ती वाढतच चालल्याने राष्ट्रवादीच्या नेत्यांनी मंगळवारी पोलिस आयुक्त के. पदमनाभन यांची भेट घेऊन त्यांच्याकडे ही मागणी लेखी स्वरुपात केली. 

या शिष्टमंडळात शहराध्यक्ष संजोग वाघेरे-पाटील, कार्याध्यक्ष प्रशांत शितोळे, महिला शहराध्यक्षा वैशाली काळभोर,ज्येष्ठ नगरसेवक नाना काटे, दत्ता साने, नगरसेविका सुलक्षणा धर आदींचा समावेश होता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com