सिंहगड रस्त्यावर पोपटाला जीवदान

गणेशमळा - सम्यक दातार यांच्याकडे असलेला तो जखमी पोपट.
गणेशमळा - सम्यक दातार यांच्याकडे असलेला तो जखमी पोपट.

सिंहगड रस्ता - सनसिटी परिसरातील नागरिकांनी पोपटाला जीवदान देउन ‘व्हॅलेंटाइन डे’ अनोख्या पद्धतीने साजरा केला. प्रेम द्या, प्रेम घ्या, प्रेमाने जगा, असा संदेश देणाऱ्या आजच्या दिवशी पक्षी, प्राण्यांवरही प्रेम केले पाहिजे हा संदेशही नागरिकांनी कृतीतून दिला आहे.

अथर्व टेरेसेस येथील झाडाच्या उंच टोकावर एक पोपट तडफडत होता. बाकीचे पोपट, पक्षी त्याच्या भोवती येरझाऱ्या घालत होते. अडकलेला पोपट जिवाच्या आकांताने टाहो फोडत होता. कदाचित तो मांज्यात अडकला असावा. ॲड. नरहर कुलकर्णी आणि मुग्धा कुलकर्णी यांनी त्याला सोडविण्याचा प्रयत्न केला. सोसायटीतीलच सुमन हिंगे यांनी मदत केली. मात्र अपयश आले.

अखेर एरंडवणेतील अग्निशमन दलाच्या जवानांनी पोपटाला काढण्याचा प्रयत्न सुरू केला. पण पोपट सुटून आंब्याच्या झाडाकडे गेला. पक्षिमित्र सत्यम दातार यांना ॲड. कुलकर्णी यांनी दूरध्वनीवर सविस्तर माहिती दिली. 

पाऊण तासाने दातार यांना गणेशमळा परिसरात त्यांच्या घराजवळ एक कुत्रा तोंडात पोपटाला घेऊन जाताना दिसला. त्यांनी त्याला कुत्र्याच्या तावडीतून सोडवून उपचार केले. 

पोपटाच्या पायाला लागले होते. पंखालाही इजा झाली होती. पण उपचारामुळे तो वाचला. एरंडवणे येथील राजेंद्र भिलारे, कैलास पवार, महेश देशमुख, मतंदार नलावडे, तन्मय घोलप चालक सतीश जगताप यांनी मदत केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com