‘तेजस्विनी’ला प्रतिसाद

पुणे - तेजस्विनी बसला महिलांची पसंती असून, दिवसेंदिवस प्रवाशांची संख्या वाढत आहे.
पुणे - तेजस्विनी बसला महिलांची पसंती असून, दिवसेंदिवस प्रवाशांची संख्या वाढत आहे.

पिंपरी - नव्या स्वच्छ बस, त्यात बसायला मिळणारी जागा, महिला कंडक्‍टर अन्‌ मुख्य म्हणजे सुरक्षितता... यामुळे ‘लेडीज स्पेशल तेजस्विनी’ बससेवा महिलांना हवीहवीशी वाटू लागली आहे. या बसला प्रवासी महिलांचा प्रतिसादही वाढू लागला आहे. मात्र, अजूनही महिलांच्या बसमध्ये होणारी पुरुषांची घुसखोरी महिलांना अस्वस्थ करीत आहे. 

सरकारने दिलेल्या विशेष निधीतून शहरात ३३ तेजस्विनी बस आल्या आहेत. गेल्या वर्षी महिला दिनाचे (८ मार्च) औचित्य साधूनही बससेवा सुरू झाली. आता आणखी ३३ बस मंजूर झाल्या आहेत. त्यातील ६ बस  दाखल झाल्या आहेत, तर उर्वरित बस अल्पावधीत येणार आहेत.  

 स. प. महाविद्यालयात कला शाखेच्या तिसऱ्या वर्षात शिकणारी रेश्‍मा पूर्वी नेहमीच्या बसमधून प्रवास करायची. त्यात गर्दीच्या वेळा बसमध्ये बसायला जागा मिळत नव्हती. महिलांच्या जागांवर पुरुष प्रवासी बसलेले असायचे. महिला स्पेशल बसमुळे दिलासा मिळाला आहे, असा अनुभव रेश्‍माने  सांगितला. पार्वती कांबळे याही पर्णकुटीपासून स्वारगेटदरम्यान महिलांसाठीच्या बसने नेहमी प्रवास करतात. प्रवासासाठी त्या हमखास लेडीज स्पेशलचाच वापर करतात. मात्र, या बसची संख्या कमी असून फेऱ्याही कमी आहेत, अशीही तक्रार त्यांनी केली. आशा शिंदे याही अधूनमधून महिलांसाठीच्या बसचा वापर करतात. परंतु, महिला प्रवाशांची संख्या कमी असल्यामुळे पुरुष प्रवाशांना घेतले जाते. त्याला शिंदे यांनी आक्षेप घेऊन तक्रारही नोंदविली आहे. तेजस्विनी बस चांगल्या आहेत. परंतु, त्यांची संख्या वाढविली पाहिजे अन्‌ वेळापत्रकानुसार त्या धावल्या पाहिजे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

प्रवासासाठी महिलांना सुरक्षितता लाभली आहे. दोन महिन्यांत महिलांसाठीच्या बसची संख्या ६६ होणार आहे. महिला स्पेशलला मिळणारा प्रतिसाद असाच वाढता राहिला, तर आणखी बस घेण्यात येतील.  
- नयना गुंडे, अध्यक्ष, पीएमपी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com