पुणे विद्यापीठात नोकरीच्या आमिषाने तरुणांची फसवणूक 

Crime
Crime

पुणे - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात नोकरी लावण्याचे आमिष दाखवून बेरोजगार तरुणांची फसवणूक करणाऱ्या आरोपीला खडक पोलिसांनी अटक केली. आरोपीसह त्याच्या साथीदाराने नोकरीच्या आमिषाने काही तरुणांची लाखो रुपयांची फसवणूक केल्याचे समोर आले आहे.

या प्रकरणी सुलभा अरुण बनसोडे (वय ६०, रा. गुरुवार पेठ) यांनी फिर्याद दिली आहे. भारत शिवाजी खेडकर (वय २८, रा. वंजारवाडी, ता. बारामती) असे अटक आरोपीचे नाव असून, त्याचा साथीदार यशवंत शिवाजी खेडकर हा फरार आहे.

या दोघांनी खडक, विश्रामबाग, डेक्कन, वेळापूर, सांगोला आणि सोलापूर येथील तरुणांची फसवणूक केल्याचे तपासात समोर आले आहे. बनसोडे यांच्या मुलाला विद्यापीठात लिपिक पदावर नोकरी लावण्याचे आमिष दाखवून आरोपींनी सात लाख रुपये घेतले. ही रक्‍कम घेतल्यापासून दोघेही आरोपी पसार झाले होते.

याबाबत बनसोडे यांनी पोलिस ठाण्यात फिर्याद दिल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला. आरोपी हा बारामती तालुक्‍यातील चौधरवस्ती येथे आल्याची माहिती मिळाली. त्यावरून पोलिसांनी तेथे त्याला ताब्यात घेतले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com