जळगावसाठी देवकरच 'राष्ट्रवादी'चे उमेदवार 

Gulabrao Devkar
Gulabrao Devkar

जळगाव : गेल्या काही दिवसांपासून ताणल्या गेलेल्या जळगाव लोकसभा मतदारसंघासाठीच्या राष्ट्रवादी कॉंग्रेसमधील उमेदवारीचा तिढा अखेर आज मिटला. पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी माजी मंत्री गुलाबराव देवकर यांना तयारीला लागा, असा आदेश देत उमेदवारीवर शिक्कामोर्तब केले. 

देवकर सोमवारी (ता. 18) चाळीसगाव येथे एका विवाह सोहळ्यात असताना त्यांना पक्षाचे नेते शरद पवार यांनी मोबाईलवरून उमेदवारी देत असल्याचे सांगितले. "लोकसभा निवडणुकीच्या लग्नाची तयारी सुरू करा,' असा आदेश पवार यांनी त्यांना दिला. त्यानुसार मंगळवारी लगेच देवकर यांनी तरसोद येथे जाऊन श्रीगणेशाचे दर्शन घेत प्रचाराला प्रारंभ केला. 

चाळीसगावात काल विवाह सोहळ्यात असताना शरद पवार साहेबांचा फोन आला. त्यांनी उमेदवारी निश्‍चित असल्याचे सांगत तयारी सुरू करण्याचा आदेश दिला. दोन दिवसांत प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन तालुका मेळावे व नंतर गावनिहाय बैठकींना सुरवात करू. 
- गुलाबराव देवकर, नेते, राष्ट्रवादी कॉंग्रेस 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com