धार्मिक स्थळी स्वच्छतेचे महात्म्यही पसरावे : ईशादिन शेळकंदे

wani
wani

वणी (नाशिक) : वणी हे धार्मिक व पर्यटन दृष्ट्या महत्वाचे ठिकाण असून येथील धार्मिक स्थळाच्या महात्म्याबरोबरच स्वच्छतेचे महात्म्यही सर्वत्र जाण्यासाठी वणीकरांनी स्वच्छता राखणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी ईशादिन शेळकंदे यांनी केले.

स्वच्छ भारत मिशन अंतर्गत स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण अभियान 2018 अंतर्गत काल (ता. 25) येथील बसस्थानक व ग्रामीण रुग्णालयात स्वच्छता मोहिम राबविण्यात आली. या स्वच्छते मोहिमेत ईशादिन शेळकंदे यांच्यासह गटविकास अधिकारी भुपेंद्र बेडसे, जिल्हा परीषद सदस्या छाया गोतरणे, सरपंच सुनिता भरसट, सामजिक कार्यकर्ते रविकुमार सोनवणे, माजी सरपंच मधुकर भरसट, विजय बर्डे, ग्रामपंचायत सदस्य दगु भरसट, मनोज थोरात, मनोज धुम, शकुंतला कोकाटे, द्रोपदाबाई गांगुर्डे, मंगला चौधरी, देवराम खांडवी, समाज सेविका मिना पठाण, ग्रामविकास अधिकारी जी. आर. आढाव यांच्यासह अंगणवाडी सेविका, मदतनिस, ग्रामपंचायत कर्मचारी व ग्रामस्थ सहभागी झाले होते.

यावेळी बसस्थानक परीसरातील असलेले व्यवसायिकांनाही परिसरात स्वच्छता राखण्याबाबत ताकीद देण्यात आली. परीसरात वाढलेल्या गवतावर ग्रामपंचायतीने तणनाशकाची फवारणी व आठवडे बाजार पंटागणाची नियमित स्वच्छता राखण्याबाबत ग्रामपंचायत व ग्रामस्थांना गटविकास अधिकारी बेडसे यांनी आवाहन केेेेले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com