खापा येथील जुगार अड्ड्यावर छापा

खापा - एलसीबी पथकासह अटकेतील आरोपी.
खापा - एलसीबी पथकासह अटकेतील आरोपी.

नागपूर - सावनेर तालुक्‍यातील खापा येथे एका फार्महाउसवर चालणाऱ्या जुगार अड्ड्यावर छापा टाकून २४ आरोपींना अटक केली आहे. यात नागपुरातील अनेक लब्धप्रतिष्ठितांचा समावेश आहे. पोलिसांनी ३९ लाख ३ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. अलीकडच्या काळातील ही सर्वांत मोठी कारवाई मानली जात आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, स्थानिक गुन्हे शाखेच्या विशेष पथकाला (एलसीबी) खापा पोलिसांच्या हद्दीतील खुबाळा शिवारात नागपूर येथील जनार्दन बोंदरे यांचे फार्महाउसमध्ये नागपूर येथील काही व्यक्ती जुगार खेळत असल्याची माहिती मिळाली होती. यानुसार एलसीबीचे पोलिस निरीक्षक संजय पुरंदरे यांच्या पथकाने छापा टाकला. 

यावेळी २४ जण पैशाची बाजी लावून जुगार खेळत असल्याचे आढळून आले. त्यांच्याजवळून रोझ ६५ हजार ६५०, २० मोबाईल (किंमत २ लाख ७ हजार ५००) तीन कार (किंमत ३५ लाख)व दोन दुचाकी (१ लाख ३०हजार) असा एकूण ३९ लाख ०३ हजार१५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

पोलिसांनी प्रकाश गणपत खोरगडे, राजेश धनराज फटिंग, अमोल अनिल चहांदे, रोहित प्रमोद मेंढे, मिलिंद पुरुषोत्तम तांदुळकर, पलाश राजू उईके, विशाल गजानन धुर्वे, ग्लेन फ्रांसीस मिलन, आकाश जॉर्ज जेम्स, विक्की जुगराज कटारीया, सुरज राजु उईके, असलम शेख रियाज शेख, सतिष सुखदेव कांबळे, राहुल मधुकर भालेराव, अफजल खान मरेहसिन खान, शशीकांत माणिकरावजी गाडीगोने, संकेत अवधुत सुप्रीतकर, किशोर छोटेलाल बैसवारे, प्रवीण विजयराव खराडे, आनंद अशोक फटींग, उमेश गणपतराव खोरगडे, विशाल रमेश शिवपेठ (सर्व रा. नागपूर) जगदीश वसंतराव जगताप, उमेश दत्तराव काकडे (रा. गुमथळा, कोराडी) यांना अटक केली आहे. खापा पोलिसांनी सर्व आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत. ही कारवाई अनिल राऊत, लक्ष्मीप्रसाद दुबे, सूरज परमार, नीलेश बर्वे, नाना राऊत, राजेंद्र सनोडिया, सत्यशील कोठारे व प्रणयसिंग बनाफर, अमोल कुथे यांनी केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com