जखमी स्ट्रीट डॉगचे ‘रूट कॅनल’

Dog
Dog

नागपूर - रस्त्यावरील एक शांत कुत्रा अचानक आक्रमक झाला होता. त्याच्या वर्तणुकीतील बदल दंतवैद्य डॉ. साखरकर यांना दिसून आला. एके दिवशी त्याच्याकडे निरखून पाहिले असता त्याचा दात तुटला असल्याचे दिसले. साखरकर यांनी त्याला त्वरेने पशुतज्ज्ञ डॉ. होले यांच्या क्‍लिनिकमध्ये नेले. दोघांनी त्या श्‍वानाची तपासणी करून सर्जरी करायचे ठरविले आणि पाळीव (डोमॅस्टिक) प्राण्यातील पहिले ‘रूट कॅनल’ नागपुरातील छत्रपती चौकात असलेल्या क्‍लिनिकमध्ये यशस्वीपणे पार पडले.

डेंटल क्‍लिनिकमध्ये लहानांपासून ते मोठ्यापर्यंत रुट कॅनल किंवा दंतोपचारासंबंधित अनेक उपचारांची उपलब्धता अत्यंत सामान्य आहे. परंतु, प्राण्यांनी काय करावे, त्यांना काही त्रास असल्यास ती बोलू किंवा सांगू शकत नाही. मग त्यांच्या वर्तणुकीत बदल दिसायला लागतात. काही वेळा हे बदल अतिशय आक्रमक असून ते मानवास हानी पोचवतात तर काही बदल कळत नाही, मात्र त्या संबंधित जनावराची प्रकृती ढासळून अनेक समस्या निर्माण होतात. डॉ. रोशन साखरकर यांना रस्त्यावर रोज दिसणाऱ्या एका श्‍वानामध्ये हा बदल दिसला आणि त्यांनी पशुतज्ज्ञ डॉ. आकाश होले यांच्यासोबत तपासणी करून रुट कॅनलचा पर्याय सुचविला. डॉ. होले यांनीही सकारात्मक विचार करून आपल्या क्‍लिनिकमध्ये सर्जरी करण्यासाठी मदत केली. सध्या हा श्‍वान देखरेखीखाली असून बरा होत असल्याचे दोन्ही डॉक्‍टर्सनी सांगितले. अनेक घटनांमध्ये शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर बाकीच्या प्रक्रिया पार पडल्या जातात. यामध्ये दंतसंबंधी नोंद करावी अशा आमची मागणी आहे. कारण मानव किंवा प्राण्यांच्या दंतअभ्यासाच्या नोंदीवरून, विस्तृत विश्‍लेषणावरून त्याच्या संबंधित अनेक बाबींवर प्रकाश पडू शकतो, असेही डॉ. साखरकर आणि डॉ. होले म्हणाले.

समस्या सुटण्यास मदत
वन्य (वाइल्ड) प्राण्यांचे नख आणि दात हे प्रमुख अस्त्र आहे. त्याला काही इजा झाली तर  त्यांना शिकार करणे अवघड होते. यामुळे ते शेळी, कुत्रा किंवा मानवासारख्या सॉफ्ट टार्गेटवर हल्ला करतात. काही वन्यप्राण्यांमध्ये रुट कॅनलसह विविध प्रकारच्या सर्जरी करण्यात आल्याची नोंद आहे. परंतु, पाळीव प्राणी असलेल्या श्‍वानावर रुट कॅनल करण्याची फारशी नोंद नाही.

२०१३ मध्ये आग्रा येथे अस्वलावर अशी सर्जरी केलचे इंटरनेटवर सर्च केल्यानंतर समजले. मात्र, त्याविषयी अधिकृत माहिती नाही. मौखिक आरोग्याविषयी योग्य काळजी घेतल्यास पाळीव, वन्यप्राण्यांमुळे उद्भवणाऱ्या समस्या सुटण्यास मदत होणार आहे, असे दंतवैद्य डॉ. रोशन साखरकर यांनी सांगितले.

तपासणी करून निदान केल्यावर रुट कॅनल करण्याचे ठरविले. यासाठी ॲनेस्थेशिया कंट्रोल करण्यापासून अनेक बाबी निगडित होत्या. सर्जरीमध्ये साहाय्य म्हणून डॉ. स्वप्नील नागमोते आणि प्रकाश यांचीही याबाबतीत मदत घेण्यात आली. सध्या हा डॉग स्वस्थ असून त्याची आक्रमकता कमी झाली आहे.
- डॉ. आशीष होले, पशुतज्ज्ञ

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com