पेट्रोलसाठी गाड्या ठेवल्या गहाण

नागपूर - पेट्रोल दरवाढीच्या विरोधात युवक काँग्रेसचे कार्यकर्ते फलक लावून आंदोलन करताना.
नागपूर - पेट्रोल दरवाढीच्या विरोधात युवक काँग्रेसचे कार्यकर्ते फलक लावून आंदोलन करताना.

नागपूर - शहरात पेट्रोलच्या दराने नव्वदी पार केली आहे. आज पेट्रोलचे दर ९० रुपये ८ पैसे इतके होते. ज्या झपाट्याने पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ होत आहे, त्यामुळे महिनाभरात शतक गाठण्याची शक्‍यता आहे. या दरवाढीविरोधात युवक काँग्रेसने पेट्रोल खरेदी करण्यासाठी गाड्या गहाण ठेवून आंदोलन केले.

महिन्याभरापासून इंधनाच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. यामुळे सरकारविरोधात प्रचंड असंतोष खदखदत आहे. याची दखल घेण्याऐवजी केंद्र सरकार राज्यांना कर कमी करण्याची सूचना करीत आहे. मात्र, आधीच आर्थिक संकटात असलेले राज्य सरकार त्यास नकार देत आहे. यामुळे मध्यमवर्गीय पिळला जात आहे. याविरोधात आज सराफा बाजारात गाड्या विक्रीसाठी काढून आंदोलन करण्यात आले. पेट्रोल भरण्यासाठी गाड्या गहाण ठेवून सराफा व्यापाऱ्यांकडून कर्जही घेतले. 

युवक काँग्रेसचे राष्ट्रीय महासचिव बंटी शळके यांच्या नेतृत्‍वात करण्यात आलेल्या आंदोलनात फजलूर रहमान कुरेशी, नावेद शेख, वसीम शेख, मोहम्मद फैजान, शाहनवाज  शेख, शोएब अन्सारी, दुर्गेश हिंगनेकर, वरुण पुरोहित, निखिल बालकोटे, राहुल मोहोड, शेख तौसिफ, नितीन जुमडे, मोहम्मद खिजर, शाहबाज खान चिश्‍ती आदी सहभागी झाले होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com