बोगस महिला डॉक्टरांकडून गर्भवती मातांच्या जिवाला धोका

कारवाई करणाऱ्या समित्या मात्र कागदावर
Danger lives of pregnant mothers from bogus female doctors
Danger lives of pregnant mothers from bogus female doctorssakal

अचलपूर : मेळघाटातील मातामृत्यू, बालमृत्यू कमी करण्यासाठी आरोग्य विभाग विविध योजना राबवितो. मात्र, तरीसुद्धा मातामृत्यूबाबत शून्य उद्दिष्ट पूर्ण होताना दिसत नाही. याला कारणे विविध असली तरी बोगस डॉक्टर हेसुद्धा महत्त्वाचे कारण आहे. बोगस महिला डॉक्टरमुळे गर्भवती मातांच्या जिवाला धोका निर्माण झाला आहे. हे डॉक्टर मातामृत्यूला कारणीभूत ठरत असल्याची धक्कादायक माहिती आहे.

मेडिकल कौन्सिलची कुठल्याही प्रकारची पदवी तथा वैद्यकीय व्यवसाय करण्याचा परवाना नसताना मेळघाटात मागील कित्येक वर्षांपासून बोगस डॉक्टरांनी दवाखाने थाटले आहेत. मात्र, कारवाई होत नसल्याने त्यांची हिंमत वाढली आहे. आता तर यामध्ये महिला बोगस डॉक्टरची भर पडली आहे. या महिला बोगस डॉक्टरमुळे गर्भवती मातांच्या जिवाला धोका निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे, या बोगस महिला डॉक्टर मेळघाटच्या मातामृत्यूला कारणीभूत ठरत आहेत.

आता तर बोगस डॉक्टरांकडून गर्भवती महिलांना सरकारी रुग्णालयात प्रसूती न करण्याचा सल्ला देण्यात येत असल्याची माहिती समोर येत आहे. त्याचा परिणाम म्हणून चिखलदरा तालुक्यातील अनेक गर्भवती महिला सरकारी रुग्णालयात न जाता घरीच प्रसूती करण्याचा निर्णय घेतात. मात्र, हा निर्णय कधी कधी गर्भवती महिलांच्या जिवावर बेतणारा ठरतो. याचा अनेकदा प्रत्यय येत आहे. या बोगस महिला डॉक्टर पैशासाठी गर्भवती महिलांच्या जिवाशी खेळ खेळत आहेत. मात्र, याचा सर्वाधिक त्रास आरोग्य कर्मचाऱ्यांना होत आहे.

मेळघाटातील अनेक गावांत या बोगस महिला डॉक्टरांनी आपला व्यवसाय घट्ट केल्याने येथील महिला आरोग्य कर्मचाऱ्यांनी कितीही समजावून सांगण्याचा प्रयत्न केला, तरीसुद्धा प्रसूतीसाठी सरकारी रुग्णालयात तयार होत नसल्याची माहिती आरोग्य कर्मचाऱ्यांकडून मिळाली आहे. या बोगस डॉक्टरांवर कारवाई करणाऱ्या समित्यांचे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे. याकडे वेळीच लक्ष दिले नाही तर मेळघाटातील मातामृत्यूचा आकडा अधिक वाढण्याचा धोका आहे.

चिखलदरा तालुक्यात जर कोणी बोगस दवाखाना चालवत असेल आणि त्याची माझ्याकडे नावानिशी तक्रार आल्यास निश्चितच चौकशी करण्यात येईल. सोबतच जिल्हाधिकारी यांच्याकडे कारवाईसाठी शिफारस करण्यात येईल.

-जयंत बाबरे गटविकास अधिकारी, चिखलदरा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com