National Highway from Aurangabad to Nagpur 10 people killed in 8 accidents akola
National Highway from Aurangabad to Nagpur 10 people killed in 8 accidents akolasakal

...अन् अर्ध्यावरती डाव मोडला; बस ठरली काळ

औरंगाबाद ते नागपूर या राष्ट्रीय महामार्गावर सातत्याने अपघाताची मालिका

मेहकर : खानदेशातील युवकाचा विदर्भात विवाह ठरल्यामुळे संपूर्ण कुटुंबीयांसोबतच नातेवाईकांमध्ये मोठी क्रेझ होती. जळगाव खानदेश जिल्ह्यातील चाळीसगाव येथील योगेश विसपुते यांच्या विवाहनिमित्त जल्लोषाची ओढ बस्ता आणि साखरपुड्याअगोदरच संपुष्टात येईल याची पुरती कल्पनाही मित्रांसह नातेवाइकांनी केली नसले. नागपूरकडे जाणार्‍या खासगी लक्झरीने त्यांच्यावर कळरुपी झडप घालत आनंदाचा क्षणार्धात काळोख करून अर्धांवरती डाव मोडल्यामुळे दोन्ही कुटुंबीयांना चांगलाच हादरा बसला आहे.

औरंगाबाद ते नागपूर या राष्ट्रीय महामार्गावर सातत्याने अपघाताची मालिका घडत असून, यावर पोलिस, उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाचा मात्र कुठलाच वचक नाही. सुसाट धावणार्‍या या काळरुपी लक्झरी बसेसने पुरती तिघांसह कुटुंबीयांच्या स्वप्नांची राख रांगोळी केली आहे. मोठी आनंदात भल्या पहाटे साखरपुडा आणि लग्न बस्त्याच्या कार्यक्रमासाठी निघायचे म्हणून चाळीसगाव येथील विसपुते कुटुंबीयांनी लगबग केली. परंतु, त्यांना कल्पनाही नव्हती की, समोर काळ त्यांची वाट पहात आहे.

एक वाहन समोर गेल्यानंतर एका अल्टो कारमध्ये तिघांभावापैकी सर्वांत मोठा नवरदेव योगेश विसपुते, मधला भाऊ विलास विसपुते, मित्र इंदल चव्हाण, मिथून रमेश चव्हाण, ज्ञानेश्‍वर चव्हाण हे लग्नाचा बस्ता बांधण्यासाठी यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी येथे निघाले. ते सकाळी 4 वाजेदरम्यान, मेहकर शहरानजीकच्या खामखेड फाट्यावर आले असता, सैनी ट्रॅव्हल्सची लक्झरी बस व अल्टो कार यांच्यात भीषण अपघात झाला. यात लक्झरी बस क्रमांक एमएच 40 बी एल 7061 अतिशय वेगाने जात असताना, अल्टो कार क्रमांक एम एच 06 डब्लू 5134 ला जोरदार धडक दिली. यात योगेश विनायक विसपुते (वय 35) हा नवरदेव, त्याचा भाऊ विलास विनायक विसपुते (वय 32) यांच्यासह मित्र इंदल चव्हाण (वय 38) या तिघांचा जागीच मृत्यू झाला. अपघात इतका भीषण होता की, कार लक्झरीच्या समोरील भागात घुसली होती. त्यामुळे कारला बाहेर काढून त्यातील मृतक व जखमींना बाहेर काढण्यास पाऊण तास लागला.

ठाणेदार निर्मला परदेशी, पोलिस कर्मचारी, रुग्णवाहिका चालक समाधान नवले, ऋषिकेश मानघाले हे सर्वप्रथम घटनास्थळी पोचले व मदतकार्य केले. गंभीर जखमी मिथुन रमेश चव्हाण, ज्ञानेश्वर रंगनाथ चव्हाण यांचेवर ग्रामीण रुग्णालयात उपचार करून त्यांना बुलडाणा येथे पुढील उपचारासाठी पाठविण्यात आले. योगेश विसपुते याचा विवाह आर्णी येथे 18 मे ला निश्‍चित झाला होता. आज साखरपुडा व लग्न बस्ता खरेदी होणार होता. नवरदेव, त्याचा भाऊ व मित्राचा मृत्यू झाल्याने दुपारी पोचलेल्या नातेवाइकांनी ग्रामीण रुग्णालयात काळीज पिळवटून टाकणारा आक्रोश केला. अपघात प्रकरणी पोलिसांनी लक्झरी चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

पेट्रोल पंपावर काम करत करायचे उदरनिर्वाह

अपघातातील मृतक व जखमी योगेश विसपुते, इंदल चव्हाण, मिथुन चव्हाण, ज्ञानेश्वर चव्हाण हे चाळीसगाव येथील पाटील पेट्रोल पंपावर काम करत होते. त्यातील विलास व योगेश विसपुते हे सख्खा भावाचा मृत्यू झाल्यानंतर सर्वांत लहान भाऊ नीलेश विसपुते व त्याची आई हे दोघेच कुटुंबात उरले आहे. दोन्ही भावाचे मृतदेह बघितल्यावर नीलेश भोवळ येऊन जागीच कोसळला. नातेवाइकांनी त्याला सावरले.

लक्झरी चालकांचा अतिरेक

नागपूर ते औरंगाबाद मार्गावर लक्झरी चालकांचा दिवसेंदिवस अतिरेक वाढला असून, पुढे जाण्याची स्पर्धा, लवकर पोचण्याचे उद्दिष्ट तसेच अनेक अतिउत्साहीपणा जिवावर बेतत असून, याला आळा घालण्यात आरटीओ आणि पोलिस प्रशासन अकार्यक्षम ठरत आहे. त्यामुळेच तिघांचा जीव गमविण्याची ही वेळ ओढवली आहे.

अतिरिक्त लाइटचा सर्रास वापर आणि अमर्यादीत वेग

खासगी लक्झरी बससंदर्भात नियमावली बनवली आहे. परंतु, याला हरताळ फास अतिउच्चक्षमतेचे लाइट, बोनटखाली अतिरिक्त लाइट असल्यामुळे समोरी वाहनचालक गोंधळतो आणि परिणामी अपघात होण्यास कारणीभूत ठरते. विशेष म्हणजे या लक्झरींची अमर्यादीत वेग क्षमतेवर कोणतेही अंकुश राहिलेले नाही.

8 अपघातात 10 व्यक्तींचा मृत्यू

औरंगाबाद ते नागपूर या मार्गावर विशेषत: लक्झरी बसच्या अपघातात आतापर्यंत 8 अपघातात 10 व्यक्तींचा मृत्यू विविध ठिकाणी झाला आहे. याला अतिवेग आणि लाइट जास्तीत जास्त कारणीभूत ठरले असून, याउपरही अद्याप प्रशासन झोपेचे सोंग घेत असल्याचा आरोप होत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com